आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍यांना मिळणार हेक्टरी 75 लाख !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड- शेंद्रा-बिडकीन मेगा प्रकल्पासाठी करमाड येथील शेतकर्‍यांच्या जमीनीला हेक्टरी 75 लाख रुपये मोबदला देण्यात येण्याची शक्यता आहे. मंगळवारी विधानभवनात उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी जमीनीच्या दरावर चर्चा केली. त्यावेळी प्रतिएकर 30 लाख रुपये देण्याचे ठरले. या हिशेबाने हेक्टरी 75 लाख रुपये मोबदला मिळेल. तथापि, याबाबत अंतिम निर्णय व घोषणा दोन दिवसानंतर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मेगा प्रकल्पासाठी करमाड परिसरातील साडेपाचशे हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने या जमिनीला एकरी 20 लाख रुपये दर देण्याचे ठरवले आहे; परंतु शेतकर्‍यांनी हा दर अमान्य करत मंगळवारी उद्योगमंत्री नारायण राणे यांची विधानभवनात जाऊन भेट घेतली. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करमाडच्या शेतकर्‍यांच्या जमीनीला प्रतिएकर तीस लाख रुपये दर देण्याचे जवळपास निश्चत झाले आहे, परंतु उद्योगमंत्र्यामागे कामाचा व्याप अधिक असल्याने मंगळवारी याबाबत घोषणा होऊ शकली नाही.
या बैठकीला एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, ज्ञानेश्वर आर्दड, उद्योग सचिव, उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे आदींची उपस्थिती होती. एकनाथ सोळुंके, दत्ता उकिर्डे, शेख जहिरोद्दीन, काकासाहेब कोळगे आदी शेतकर्‍यांची उपस्थिती होती.
दोन दिवसांत अंतिम निर्णय- दरासंदर्भात दोन दिवसांत उद्योगमंत्री, उद्योग सचिव व एमआयडीसीचे अधिकारी बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत.
अन्याय होणार नाही : राणे- पुणे, नागपूर येथे जमिनींना दिलेले दर विचारात घेतले जातील. शेतकर्‍यांवर अन्याय होईल असा निर्णय घेतला जाणार नाही, असे राणे म्हणाले.
प्रकल्प व मोबदला
मिहान प्रकल्प, नागपूर हेक्टरी 95 लाख
एमआयडीसी, पिंपरी चिंचवड हेक्टरी 50 लाख
जैतापूर प्रकल्प, कोकण हेक्टरी 25 लाख
शेती : शेतक-यांची आणि तुमची-आमचीही
दुष्काळ निवारण, शेती नुकसानभरपाईसाठी केंद्राने दिले 588 कोटी
शेती व्यवस्थेचा मार्गदर्शक ग्रंथ