आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी खातोय खस्ता, दुष्काळ घालतोय घिरट्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- कन्नड तालुक्यात पावसाचे जून महिन्यात वेळेवर आगमन झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यंदा तरी दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडून चांगले पीक घेऊ व देणी फेडू, त्यामुळे उसनवारी, कर्ज काढून, महागडे बी-बियाणे खरेदी करत खरिपाची पेरणी केली. मात्र, वेळेवर चांगल्या पावसाच्या आगमनाची चाहूल देऊन नंतर हुलकावणी देणाऱ्या वरुणराजाने अद्याप हजेरी न लावल्याने शेतकरी पावसासाठी कासावीस झाला आहे. दुष्काळाचे दुष्टचक्र या वर्षीही घिरट्या घालत असल्याचे लक्षात येत असल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे. रोज सकाळी आभाळाकडे पाहून आज तरी बरसेल या आशेने आला दिवस घालत आहे. पण, पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

खेर्डा परिसरातील शेतकऱ्याने दीड महिन्यापूर्वी मका लावली; परंतु दीड महिन्याचा कालावधी लोटून गेल्यानंतरही पाऊस नाही. त्यामुळे एकरभर लावलेली मका एक-दीड फूटही वाढली नाही. आता पाऊस पडूनही या पिकाचा काहीच उपयोग होणार नाही. एकरभर मका उपटून फेकल्यानंतरही एक गठ्ठाभर चाराही निघला नाही.

१७ शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
कन्नड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच १७ शेतकऱ्यांनी जीवनास कंटाळून मृत्यूस कवटाळले आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे लोण थेट कन्नड तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आता तरी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.