आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखंडाळा - खरीप हंगामाला सुरुवात झाली की शेतक-यांची बी-बियाणे, खत, रासायनिक औषधी इत्यादींची खरेदी करण्याची लगबग सुरू होते. अशा वेळी उत्पादनाची अधिक विक्री व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात कंपन्या जाहिरातबाजी करून शेतक-यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. शेतक-यांची सर्व माहिती गोळा करून या कंपन्या त्यांना फोनद्वारे विविध योजनांबद्दल माहिती देतात, तर काही कंपन्या प्रत्यक्ष गावात किंवा शेतात जाऊन त्यांना प्रात्यक्षिकांद्वारे माहिती देतात.
शासनाच्या मध्यस्थीशिवाय होणा-या कंपन्यांच्या या ऑनलाइन फंड्यामुळे अनेक शेतक-यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत असल्याचे प्रकार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
असा आहे ऑनलाइन फंडा
राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आदी प्रमुख जिल्ह्यांतील काही खासगी बी-बियाण्यांच्या किंवा रासायनिक खतांच्या कंपन्यांनी या जिल्ह्यांमधील प्रत्येक गावात एका ऑनलाइन प्रतिनिधीची नेमणूक केली असून हा प्रतिनिधी गावातील प्रत्येक शेतक-याची संपूर्ण माहिती घेतो. त्यानुसार कंपनीद्वारे त्या शेतक-यास कुठले बियाणे अथवा खत घेणे उपयुक्त राहील याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाते. कंपन्यांच्या या आधुनिक पद्धतीमुळे सामान्य शेतकरी प्रभावित होऊन त्यांची उत्पादने सहज घेतो.
शेतक-यांकडून ही माहिती घेतात
1. शेतक-यास जमीन किती आहे? 2. मागील दोन वर्षांमध्ये कुठली पिके घेतली? 3. आंतरपीक घेतले होते का? 4. बियाणे, रासायनिक औषध व खते कुठल्या कंपनीची वापरली जातात. 5. शेतमशागत ट्रॅक्टरने केली जाते की
बैलांच्या साहाय्याने? 6. क्षेत्र बागायती की कोरडवाहू 7. शेतीला पाणी देण्याची पद्धत.
जाहिरातबाजीत शासनाची भूमिका नाही
ही सर्व जाहिरातबाजी खासगी तत्त्वावर सुरू आहे. यामध्ये शासनाचा कोणताही रोल नाही. खासगी कंपनीच्या मते ही सर्व जाहिरातबाजी शेतक-यांचे भरघोस उत्पन्न घेण्यासाठी करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.
भरघोस उत्पादनासाठी केले जाते मार्गदर्शन
संगणकामध्ये शेतक-याची माहिती गोळा करून आम्ही कंपनीस देतो. नंतर कंपनीद्वारे शेतक-याशी संपर्क साधून त्यांना भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी कुठले बियाणे व खते वापरावीत याचे मार्गदर्शन केले जाते.’’
रामनाथ भिंगारे, प्रतिनिधी, नेल्सन कंपनी
कृषी सहायकाचा सल्ला घ्यावा
जाहिरातबाजीचा व शासनाचा काही संबंध नसतो. प्रत्येक गावात कृषी सहायकाची नेमणूक असते. शेतक-यांनी कृषी सहायकाच्या सल्ल्यानुसार शेतात बियाणे अथवा खतांचा वापर करावा. यामुळे त्यांचे नुकसान होणार नाही.’’
एच. आर. बोयनार, कृषी अधिकारी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.