आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Farmers News In Marathi, Nandur Madhameshwar Water Catchment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्यासाठी शेतक-यांचा आत्मदहनाचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - नांदूर-मधमेश्वर लाभक्षेत्रातील गावांना ओव्हरफ्लोचे हक्काचे पाणी गंगापूर व वैजापूरसाठी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रविवारी आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. नांदूर-मधमेश्वर लाभक्षेत्रातील गावांना ओव्हरफ्लोचे पाणी ३ ओगस्टपासून सुरू असून टेल टू हेड नियमाने हे पाणी गंगापूरला मिळणे गरजेचे असताना दीड महिना उलटूनही नांमका अधिका-यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे गंगापूर तालुक्याला हे पाणी जाणीवपूर्वक मिळू न देण्याच्या धोरणाविरुद्ध शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेत रविवारी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या कार्यकारी अभियंत्यांची हेकेखोर व अडेलतट्टूपणाची भूमिका आणि प्रशासनावर नसलेल्या नियंत्रणामुळे दीड महिन्यापासून गंगापूरकरांना पाणी मिळत नाही.