आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र नव्या वर्षातही सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात २०१५ वर्षात ११०९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. नव्या वर्षातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अवघ्या आठ दिवसांत मराठवाड्यात २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शासकीय आकडेवारी सांगते.

मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतीचे अर्थकारण पूर्ण बिघडलेले आहे. त्यातच गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामही हातून गेल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नवीन वर्षातही आत्महत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. जालना, उस्मानाबादमध्ये प्रत्येकी सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात गेल्या आठ दिवसांत २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर औरंगाबाद-३, नांदेड-३, बीड-२, लातूर-२, परभणीत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेली नाही. चौकशीसाठी ही सर्व प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आलेली आहेत.