आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; विषारी औषध घेऊन संपवले जिवन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव अर्ज- येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. रामेश्वर दावल बलांडे (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.  
 
रामेश्वर बलांडे यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक लाख व गजानन ग्रामीण पतसंस्थेचे व खासगी हातउसने पैसे असे चार लाख रुपये त्यांच्यावर कर्ज होते. त्यांना फक्त दोन एकर जमीन आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी कर्ज काढून मुलीचे लग्न केले होते. सतत पडत असलेल्या दुष्काळाने त्यांच्या कडून ते पैसे फिटलेच नाही, उलट ते वाढतच गेले. यावर्षीही कर्ज फिटले नाही.
बातम्या आणखी आहेत...