आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरणाशिवाय काहीच सूचत नाही, माझ्या मुला-मुलीला जीव लावा म्‍हणत शेतक-याची आत्‍महत्‍या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज- पिकाला भाव नाही, निसर्ग साथ देत नाही, शेती परवडत नसल्यामुळे बँकांचे घेतलेले कर्ज फिटत नाही. मुलीचे लग्न, मुलाच्या शिक्षणासाठी भरपूर कष्ट केले. अाता मरणाशिवाय काहीच सूचत नाही. मला माफ करा. माझ्या मुला-मुलीला जीव लावा,’ अशी कैफियत एका चिठ्ठीत लिहून भानुदास तुपे यांनी  गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. 

अपुऱ्या पावसामुळे व सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे  मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे  सत्र सुरूच असून शुक्रवारी वैजापूर तालुक्यात असलेल्या बाभूळगाव खुर्द येथील अल्पभूधारक शेतकरी असलेल्या भानुदास फकिरा तुपे (४८) या शेतकऱ्याने शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता बांधावर ढेकू नदीच्या काठावर असलेल्या  गट नंबर २४६ मधील पळसाच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण  व नापिकीमुळे झालेले कर्ज, महाराष्ट्र बँकेचे दीड लाख रुपये, महिंद्रा फायनान्सचे एक लाख तीस हजार रुपये कर्ज असून हे फेडायचे कसे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली.
बातम्या आणखी आहेत...