आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हातगाडीवरील पोहे, उपमा, समोसे, कचोरी.. म्हणजे बेस्टच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शिक्षण घेण्यासाठी 50 हजारांहून अधिक विद्यार्थी बाहेरगावाहून आले आहेत. दोन वेळची मेस असते. मात्र, संध्याकाळी भूक लागते. कधीकधी मेसचे जेवण रुचकर लागत नाही. जेवल्यानंतरही भूक लागल्याचे जाणवते. अशा वेळी नाष्टा मिळणार्‍या हातगाड्या आठवतात.
स्वस्तात मस्त नाष्टा मिळत असल्याने, अशा गाड्यांवर तरुणांची गर्दी असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात राहत असतात काटकसरीची कसरत करावी लागते. मात्र, स्वस्तात मस्त नाष्टा कोठे मिळतो याची त्यांना चांगलीच माहिती असते. हे पदार्थ किती पौष्टिक असतात याचा विचार न करता पोहे, उपमा, समोसे, कचोरी, पॅटीस, दोसा, उत्तपा, ऑम्लेट, भेळ, पाणीपुरी, आदींवर ताव मारला जातो.
थोडं चेंज म्हणून
आई सतत ओरडत असते की बाहेर खाऊ नकोस. मात्र घरचे जेवण खाऊन-खाऊन बोर झालेलो असतो. त्यामुळे थोडं चेंज म्हणून टपरी, गाड्यावर नाष्टा करण्याचा मोह टाळू शकत नाही. मनोज देसाई, इंजिनिअरिंग, पीईएस
स्वस्तात मस्त नाष्टा - गाडी, टपरीवरील खाद्यपदार्थ पूर्णपणे हायजिनीक नसतात, हे मान्य आहे. पण मोजकाच पॉकेटमनी मिळतो. त्यामुळे स्वस्तात मस्त नाष्टा मिळणार्‍या ठिकाणी नाश्ता करतो. अविनाश शिंदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
मस्त गरमागरम भजी - खानावळीच्या डब्याचे जेवण मुळीच चविष्ट नसते. या जेवनाने पोटही भरत नाही. त्यामुळे बाहेर टपरीवर जाऊन नाष्टा करून येतो. गरमागरम भजी म्हणजे बेस्टच! मुग्धा किलबिले, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय
पाणीपुरीचा फटका - बाहेर नाष्टा करण्याची सवय आहे. मात्र एखाद्येवेळी पाणीपुरीचा फटका बसतो. प्रकृती बिघडते. आम्ही काहीकाळ त्यापासून दूर असतो. मात्र भेळ व पाणीपुरी कायमचे बंद करणे शक्य नाही. कविता मगर, बीएससी, मौलाना आझाद महाविद्यालय
बाहेरचे खात नाही - आई घरातच हवे ते करून मला खाऊ घालते. त्यामुळे मी कधीही बाहेरचे पदार्थ खात नाही. लग्नसमारंभ, पाटर्य़ांमध्ये जेवण करणेही टाळतो. बाहेर जाताना घरूनच पोटभर नाष्टा करून जातो. राम जोशी, एमएससी, विद्यापीठ
मैत्रिणींसोबत नाष्टा - चायनीज, इटालीय, केक इत्यादी अनेक पदार्थ आम्ही गाड्या अथवा टपरीवरच खातो. कारण या पदार्थांची किंमत हॉटेलात जास्त असते. त्यामुळे मैत्रिणींसोबत अशा पदार्थांच्या गाड्यावरच आम्ही नाष्टा करत असतो. कल्याणी कांबळे, प्राध्यापिका