आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघात: भरधाव कारने दुचाकीला उडवले; नंतर कडेला उभ्या दाेघांना चिरडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड बायपासवरील भीषण अपघातात दाेन जण कारच्या चाकाखाली अाल्यामुळे गंभीर जखमी झाले हाेते. - Divya Marathi
बीड बायपासवरील भीषण अपघातात दाेन जण कारच्या चाकाखाली अाल्यामुळे गंभीर जखमी झाले हाेते.

अाैरंगाबाद- बीड बायपासवरील हाॅटेल अादित्यसमाेर शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कार दुचाकीच्या भीषण अपघातात चाैघे जखमी झाले. त्यापैकी गाडीखाली चिरडलेल्या एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती घाटीतून देण्यात अाली. मात्र जखमींची अाेळख उशिरापर्यंत पटू शकली नव्हती. 


राखाडी रंगाची स्काेडा कार (एमएच २० सीएच ६२८८) बीड राेडच्या दिशेने जात हाेती. समाेरून राँग साइडने येणाऱ्या दुचाकीला (एमएच २० सीव्ही ०७८१) जाेराची धडक दिली. अपघातामुळे नियंत्रण सुटलेल्या कारचालकाने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या काही तृतीयपंथीयांनाही उडवले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सातारा, जवाहरनगर पुंडलिकनगर ठाण्याच्या पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारखाली दबलेल्या जखमींना घाटीत हलवले. 


जखमी कारचालक फरार
अपघातात कारचालकही जखमी झाला, मात्र त्याला अाेळखणाऱ्या परिसरातील काही लाेकांनी तातडीने येऊन उचलून नेले. त्यामुळे पाेलिसांना त्याची अाेळख पटली नव्हती. 

बातम्या आणखी आहेत...