आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनेवर अत्याचार करणारा सासरा जेरबंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद - सुनेवर बलात्कार करणा-या सास-यास खुलताबाद पोलिसांनी अटक केली. दोन महिन्यांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता. अय्युबखाँ पठाण (45, रा. हिवरखेडा, ता. कन्नड) असे आरोपीचे नाव आहे. औरंगाबाद शहरातील बेगमपुरा परिसरात त्याने अत्याचार केला होता. त्यामुळे खुलताबाद पोलिस हे प्रकरण बेगमपुरा पोलिसांकडे वर्ग करणार आहेत.


खुलताबाद पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या मुलाचा विवाह दोन वर्षांपूर्वी खुलताबाद तालुक्यातील गंदेश्वर येथील मुलीसोबत झाला होता. आरोपी सुनेला माहेरी अन् सासरी ने-आण करत असे. यामुळे मुलाचा संशय बळावला. त्याने पत्नीला सोडचिठ्ठी देण्याची इच्छा आरोपी पित्याकडे व्यक्त केली. दरम्यान, मुलाला काहीही न सांगता आरोपी सुनेसोबत औरंगाबाद शहरातील बेगमपुरा भागात राहण्यास आला. तेथे त्याने दोन महिने सुनेवर बलात्कार केला. पाच दिवसांपूर्वी मुलगी माहेरी गेली. घडलेली हकीगत तिने माहेरी कथन केली. यानंतर आरोपीने सुनेला दूरध्वनी केला. तिला घेण्यासाठी तो गावात येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार मुलीच्या वडिलांनी गावात सापळा रचला. मात्र, आरोपीने दूरध्वनी करून सुनेला वढाळी फाट्यावर येण्यास सांगितले. ती तेथे गेली. याच वेळी वडील व त्यांच्या सहका-यांनी आरोपीला पकडले. आरोपीला खुलताबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचाराची घटना बेगमपुरा परिसरात घडल्यामुळे हे प्रकरण बेगमपुरा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.