आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिकागोच्या प्राध्यापकाच्या पित्याने हॉटेलही विकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बीड बायपास रोडवरील सुमारे साडेचार कोटी रुपयांची दीड एकर जमीन पित्यासह भाऊ-बहीण आणि मेहुण्यानेच हडपली, अशी तक्रार 19 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील शिकागो येथील रिचर्ड जे. डेली महाविद्यालयातील प्राध्यापकाने सातारा पोलिस ठाण्यात केल्यानंतर बन्सीलालनगर येथील 15 कोटी रुपये किमतीचे आशियाना हॉटेलही (सध्या या हॉटेलच्या जागेवर रिगल प्लाझा नावाची इमारत आहे.) पिता व मेहुण्याने 1997 मध्ये विकून फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

8 सप्टेंबर 1986 रोजी सय्यद रझियोद्दीन सय्यद अनिसोद्दीन हे अमेरिकेहून औरंगाबादला आले होते. या वेळी मेहुणा शेख इफ्तिकार अहमद शेख दाऊद यांनी शेख अब्दुल अजीज हाजी जमाल ऊर्फ एमए अजीज यांच्याकडून बन्सीलालनगरातील येथील 650.26 स्क्वेअर मीटरचा प्लॉट 1 लाख 40 हजार रुपयांत विकत घेतला होता.

त्यानंतर 1 जानेवारी 1987 रोजी शेख इफ्तिकार यांच्यासोबत पार्टनरशिपमध्ये हॉटेल आशियाना सुरू केले. यानंतर पिता सय्यद अनिसोद्दीन जान मोहंमद आणि मेहुणा शेख इफ्तिकार यांनी बनावट कागदपत्रे व स्वाक्षरीच्या आधारे आशियाना हॉटेलचा जीपीए भाऊ शेख फसिउद्दीन याच्या नावे केला. यानंतर हाजी इस्माईल हाजी इसा आणि इतर 9 जणांना 19 डिसेंबर 1997 रोजी हॉटेल विकले. याची माहिती 2011 मध्ये समजल्यानंतर खात्री करण्यासाठी सय्यद रझियोद्दीन यांनी कागदपत्रांची जमवाजमव केली. तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला. सध्या या हॉटेलच्या जागेवर तीनमजली रिगल प्लाझा नावाची इमारत उभी आहे. शनिवारी सय्यद रझियोद्दीन यांनी फसवणूक झाल्याप्रकरणी दोघांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिता वराडे करीत आहेत.