आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हौदात पडलेल्या मुलाचे पित्यानेच वाचवले प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऐतिहासिक पाणचक्की पाहण्यासाठी आलेल्या पुणे येथील दिपुलराज घोष यांचा चार वर्षांचा चिमुरडा पाणचक्कीच्या हौदात पडला. तो हौदात पडल्याचे तेथील एका व्यक्तीने घोष यांच्या निदर्शनास आणून देताच घोष यांनी लगेच हौदात उडी मारून आपल्या चिमुरड्याचे प्राण वाचवले. त्यांना तिकीट विक्री कर्मचारी अल्ताफ यांनी मदत केली.

पुणे येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर दिपुलराज घोष आपल्या कुटुंबीयासह औरंगाबादला पर्यटनासाठी आले होते. सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ते पाणचक्की बघण्यासाठी पत्नी व कुटूंबीयांसोबत गेले. त्यांचा चार वर्षांचा मुलगा बीपरोषी घोष याने वडिलांना मी हौदाच्या बाजूलाच थांबताे असे सांगितले. घोष थोडे पुढे गेले असता त्यांच्या मागून धावत आलेल्या एका मुलाने त्यांना तुमचा मुलगा हौदात पडला, असे सांगताच घोष मागे फिरले. बीपरोषी पाण्यात बुडत असल्याचे दिसताच पोहता येत असलेल्या घोष यांनी हौदात उडी मारून बीपरोषी याचे प्राण वाचवले. तिकीट विक्री केबिनमधील कर्मचारी अल्ताफ यांनी घोष पिता-पुत्रांना बाहेर येण्यासाठी मदत केली.

पोहता येत असल्याने वाचले प्राण
बीपरोषी याला उपचारासाठी घाटीत दाखल केले असून डॉक्टरांनी २४ तास निगराणीत ठेवण्यास सांगितले होते. मात्र घोष यांनी त्यास नि ओ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. बीपरोषी याची प्रकृती बरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दिपुलराज घोष यांना पोहता येत असल्यामुळे एकुलता एक मुलगा बीपरोषी याचे प्राण वाचले.
बातम्या आणखी आहेत...