आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना : नातेवाईकाच्या लग्नास जाणाऱ्या बापलेकांवर काळाचा घाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोळेगाव (जि. औरंगाबाद) - नातेवाइकाच्या घरी लग्नसाेहळ्यासाठी आई-वडिलांसह दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेने रस्त्यावर फेकले गेल्यामुळे टॅँकरखाली सापडून २१ वर्षीय युवक ठार झाला, तर उपचारादरम्यान पिता सुखदेव इंगळे यांचा मृत्यू झाला.

जळगाव - सिल्लोड मार्गावरील पालोद फाट्याजवळ मंगळवारी (दि. १९) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. अमोल सुखदेव इंगळे असे मृताचे नाव असून सुखदेव गंगाराम इंगळे (५०), अनसूया सुखदेव इंगळे (४५) व अन्य दोन जण जखमी झाले असून इंगळे दांपत्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात होते. सुखदेव इंगळे यांचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुखदेव व अनसूया इंगळे हे मुलगा अमोलसह मोटारसायकलने (एमएच २१ ए डब्ल्यू १४८३) गोळेगाव येथून सिल्लोडकडे नातेवाइकाच्या लग्नासाठी जात होते. दरम्यान सिल्लोडहून अजिंठ्याकडे जाणाऱ्या मोटारसायकलीची (एमएच २० सीपी २७३५) समोरासमोर जबरदस्त धडक झाली. त्यामुळे अमोल इंगळे हा रस्त्यावर फेकला गेल्याने मागून आलेल्या अज्ञात टँकरच्या खाली सापडून तो जागीच ठार झाला, तर इंगळे दांपत्यासह अन्य दोन जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. घटनास्थळावरून टँकरचालक टँकरसह फरार असून टँकरचा शोध पोलिस
घेत आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कारच्या धडकेने संचालकासह कापूस व्यापाऱ्याचाही मृत्यू