आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father To Ten Years Servitude For Abuse Of Girls

मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास दहा वर्षे सक्तमजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पडेगावातील पित्यास जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांनी दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
प्रियदर्शनी कॉलनीत सलीम नुरखान हा आपल्या कुटुंबासह राहतो. मार्च २०१४ रोजी त्याची इयत्ता आठवीत शिकणारी मुलगी आजारी असल्यामुळे गोळ्या खाऊन झोपली होती. मध्यरात्री सलीमने जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीने आपल्यावर बेतलेली आपबीती वर्गशिक्षिकेस चिठ्ठीद्वारे सांगितली. पुन्हा एप्रिल २०१४ रोजी अत्याचार केले. ही घटन मुलीने तिच्या काकूला आणि अन्य कुटुंबीयांना देखील सांगितली. दरम्यान, तिची आई तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयात घेऊन गेली असता तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिची तपासणी केली. या तपासणीमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात सलीम नुरखान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एल. पठाण यांच्यासमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता अनिल हिवराळे आणि तत्कालीन वकील बी. के. पवार यांनी साक्षीदार तपासले. साक्षीदारांनी नोंदविलेले जबाब, वैद्यकीय पुराव्यावरून न्यायालयाने सलीम नुरखानला दोषी ठरवून भादंवि ३७६ (२) कलमान्वये १० वर्षे सक्तमजुरी, हजार रुपये दंड, दंड भरल्यास महिने कैद, भादंवि ५०६ कलमान्वये वर्ष सक्तमजुरी, हजार रुपये दंड, भादंवि ३२३ कलमान्वये महिने सक्तमजुरी, ५०० रुपये दंड आणि दंड भरल्यास १५ दिवस कैदेची शिक्षा सुनावली.