आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त अभियंत्याकडून शासनाला पाच कोटींचा चुना; बायको आणि भावाला कागदोपत्री दाखवले मजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बनावट कागदपत्रे तयार करून जलसंधारण खात्यातील सेवानिवृत्त अभियंता त्र्यंबक विश्वनाथ बांगर यांनी मजूर संस्था तयार करून शासनाला पाच कोटींचा चुना लावण्याचा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात बांगर यांनी नोकरीत असताना पत्नीशी संबंध नाही. ती उपजीविकेसाठी मजुरी करते असे लिहून दिले होते. एवढेच नव्हे, तर हॉटेलचालक भावासही कागदावर मजूर दाखवले होते, अशी माहिती समोर आली आहे. अनेक सरकारी अधिकारी या प्रकरणात रडारवर असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

सामाजिक कार्यकर्ते सारंगधर जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. तेव्हा बांगर यांनी स्थापन केलेल्या भद्रा मारुती मजूर संस्थेतील ३५ सदस्य उस्मानाबाद तालुक्यातील सधन व्यक्ती असून त्यांची पत्नी शारदा यांच्या नावावर जडगाव (झाल्ट्याजवळ) येथे अडीच एकर जमीन असल्याचे निष्पन्न झाले. 

यांच्यावर झाला गुन्हा दाखल 
शिवनारायण नंदाजी गिते, सुमनबाई नंदाजी गिते, रवींद्र रघुनाथ पाटील, रामेश्वर सुभाष वाडेकर, नंदाजी त्र्यंबक गिते, दीपक वसंत मोकळे, मोहन अशोक बांगर, शारदा त्र्यंबक बांगर, कल्पना अशोक बांगर, वैभव त्र्यंबक बांगर, गिरीश त्र्यंबक बांगर, पूजा सुनील मुंढे, अशोक विश्वनाथ बांगर, राहुल अशोक बांगर, श्वेता अशोक बांगर, सदामती सुनील मुंढे, सुनील सोपान मुंढे, राधा दत्ता मुंढे, जयदेव विश्वनाथ बांगर, कांताबाई जयदेव बांगर, महादेव विश्वनाथ बांगर, कृष्णाबाई विश्वनाथ बांगर, बाळू नामदेव सानप, मनीषा बाळू सानप, नामदेव बाबूराव सानप, विमल नामदेव सानप, राधामोहन बांगर, त्र्यंबक मांगू चव्हाण, विमलबाई त्र्यंबक चव्हाण, भिवा बापू मधुमले, बापू वामन मधुमले, त्र्यंबक विश्वनाथ बांगर, तत्कालीन उपनिबंधक बी. एल जाधव हे सर्व आरोपी एकमेकांचे नातेवाईक असून आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्यावर कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२, १२० आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुभाष खंडागळे तपास करत आहेत. 

काय असते मजूर सहकारी संस्था? 
अंगमेहनतकरणाऱ्या कुठलीही जमीन नसणाऱ्या किंवा अत्यल्प जमीन असून मजुरी काम करणारे लोक मजूर सहकारी संस्थेची स्थापना करू शकतात. एका वर्षात शासनाच्या विविध विभागांतील ५० लाख रुपयांपर्यंतचे कंत्राट अशा संस्थांना मिळते. शहरात अशा ४७२ संस्था आहेत. 
 
- सदस्य भूमिहीन असल्याचे सांगणारी उपनिबंधक कार्यालयात सादर केलेली सर्व कागदपत्रे बनावट अाहेत, तरीही त्यांना मजूर सहकारी संस्थेचे प्रमाणपत्र देण्यात आले. 
- २०१० मध्ये संस्था स्थापन झाल्यावर काही वर्षांतच पाटबंधारे विभागातूनच सुमारे दोन कोटी रुपयांची, तर सार्वजनिक बांधकाम विभागातून काही कामे मिळवली. 
- बांगर यांनी पत्नीसोबत राहत नसल्याचे लिहून दिले. मात्र, कार्यालयातील इतर कागदपत्रांवर नॉमिनी म्हणून पत्नीचे नाव दिले आहे. त्यांच्या नावावर सोने-चांदी, रोख रक्कम दाखवली आहे. 
- मजूर सहकारी संस्थेचे प्रमाणपत्र बनावट अाहे. 
बातम्या आणखी आहेत...