आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एफडीसी'च्या कामगारांना १२ हजार बोनस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज | येथील औद्योगिक वसाहतीमधील एफडीसी कंपनीतील कामगारांना १२ हजार बोनस जाहीर झाला असून त्याचे वाटप बुधवारी होणार आहे. पँथर पॉवर कामगार संघटनेच्या प्रयत्नांना हे यश मिळाले आहे. दोन दिवसांपूवी संघटनेचे नेते, माजी मंत्री गंगाधर गाडे आणि कंपनी व्यवस्थापनामध्ये झालेल्या करारात हा निर्णय घेण्यात आला. औषधी निर्माण करणाऱ्या या कंपनीत एकूण ९६ कामगार आहेत. त्यांना प्रत्येकी कंपनीकडून ८४०० बोनस आणि सानुग्रह अनुदान १२५० रुपये देण्यात येणार आहे. कराराच्या वेळी कंपनीच्या वतीने वर्क मॅनेजर बी. बी. टोंगळे, प्लँट मॅनेजर जे. डी. टिकेकर, एचआर मॅनेजर संतोष थावरे, तर संघटनेचे अनिल जाभाडे, डी. बी. तुपे, बी. बी. गरड, आर. जी. देसाई, डी. आर. पाटील, बी. के. सुरडकर, एम. के. खोसरे, डी. के. गायकवाड उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...