औरंगाबाद- पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौ-यामुळे सौहार्द वाढला असून जपानचे उद्योजक औरंगाबादमधील मासिआ या लघुउद्योजक संघटनेशी महत्त्वपूर्ण करार करणार आहेत. यासाठी जपानी उद्योजकांचे शिष्टमंडळ लवकरच औरंगाबादला येणार आहे. 47 उद्योजकांनी नुकताच जपानचा पाच दिवसांच्या दौरा केला आहे. त्यांनी उद्योगांविषयी तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. जपानी उद्योजकांनीही या शिष्टमंडळाला योग्य ते मार्गदर्शन केले.
तंत्रज्ञान करार करणार
औरंगाबादच्या लघुउद्योजकांशी जपानी उद्योजकांनी तंत्रज्ञान करार करण्याची तयारी दर्शवली आहे. आठवडाभराच्या दौऱ्यात
आपल्या उद्योजकांनी जपानचा औद्योगिक, सास्कृतिक, भौगोलिक, धार्मिक अभ्यासही केला. टोकियो शहरात बुलेट ट्रेन कशी तयार होते, प्लास्टिक उद्योग, निसान कंपनीत १९१७ पासून इंजिन कसे तयार करतात याविषयी माहिती घेतली.
47 लघुउद्योजक भारावले
या दौऱ्यात अजय गांधी, अमित रोहमारे, अनिल पाटील, अनिल पवार, अंकुश लामतुरे, अनुराग आगलावे, अशोक थोरात, अशोक जगधने,अतुल बनगीनवार,भाऊराव खोसे,भगवान राऊत, भरत मोतिंगे, भीमराव चौधरी, धनंजय बडवे, दिगंबर मुळे, दिगंबर नाईक, गोवर्धन बजाज, हनुमंत लोमटे, जसपाल अरोरा, कौतुभ पुलकुंडवार, किरण जगताप, नामदेव खरडे, नवनाथ काळे, नीरज गोयल, नीलेश पाटील, नितीन पाटणी, पीयूष गंगवाल, प्रकाश जाधव, श्रीधर नवघरे, श्रीनिवास राठी, श्रीराम शिंदे, सुभाषचंद्र भारुका, सुनील शिसोदिया, सुनील किर्दक, सुरेश तोडकर, तुकाराम कंडकुरे, विकास हंगे, विजय लेकुरवाळे आदी सहभागी झाले होते.