आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेडररची 3 तासांमध्ये युज्नीवर मात; दाेन सामन्यांत पाच सेटपर्यंत झुंज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क- जागतिक क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या राॅजर फेडररची २० वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची वाट अाता अधिकच खडतर हाेत असल्याचे दिसते. यासाठी त्याला माेठी कसरत करावी लागत अाहे. मात्र, चुरशीची खेळी करून ताे विजयश्री खेचून अाणत अाहे. हे त्याने अमेरिकन अाेपनच्या दुसऱ्या फेरीत सिद्ध केले. त्याला पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये विजयासाठी तब्बल पाच सेटपर्यंत शर्थीची झुंज द्यावी लागली. त्याने १८७ मिनिटे झंुज देत रशियन टेनिसपटू मिखाईल युज्नीला पराभूत केले. त्याला करिअरमध्ये प्रथमच ग्रँडस्लॅमच्या दाेन सामन्यांत पाच सेटपर्यंत विजयासाठी झुंज द्यावी लागली.
  
दुसरीकडे नंबर वन राफेल नदालने पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली. तसेच भारताच्या सानिया मिर्झा अाणि राेहन बाेपन्नाने अापापल्या गटात विजयी सलामी दिली. महिला एकेरीमध्ये अग्निजस्का रादावांस्कानेही पुढची फेरी गाठली. चेक गणराज्यच्या पेत्रा क्विताेवाने पुढची फेरी गाठली. 

नदालची ताराे डॅनियलवर मात
नंबर वन राफेल नदालने एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये राेमहर्षक विजय संपादन केला. त्याने लढतीमध्ये जपानच्या ताराे डॅनियलचा पराभव केला. त्याने ४-६, ६-३, ६-२, ६-२  ने सामना जिंकला. यामुळे त्याला तिसऱ्या फेरीतील अापला प्रवेश निश्चित करता अाला. अाता त्याचा सामना अर्जेंटिनाच्या लियाेनार्दो मेयरशी हाेईल.  मेयरने दुसऱ्या फेरीमध्ये स्पेनच्या राॅबर्टाे बतिस्ताला ६-१, ६-३, ७-६ ने हरवले.

दिमित्राेवचा पराभव
सातव्या मानांकित ग्रिगाेर दिमित्राेवचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले.  त्याला रशियाच्या अांद्रे रुबलेवने पराभूत केले. रशियाच्या खेळाडूने ७-५, ७-६, ६-३ अशा फरकाने सामना जिंकला. 

रादावांस्काची अागेकूच
दहाव्या मानांकित अग्निजस्का रादावांस्काने महिला एकेरीमध्ये अागेकूच केली. तिने दुसऱ्या फेरीमध्ये कझाकिस्तानच्या युलियाचा पराभव केला. तिने ७-५, ६-२ अशा फरकाने सामना जिंकला.  

फेडररची पाच सेटपर्यंत झंुज
१९ वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन राॅजर फेडररने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये रशियाच्या मिखाईल युज्नीचा पराभव केला. त्याने रंगतदार सामन्यामध्ये ६-१, ६-७, ४-६, ६-४, ६-२ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासाठी त्याला ३ तास ७ मिनिटे झंुज द्यावी लागली. रशियन टेनिसस्टार युज्नीने  ताेडीस ताेड खेळी करताना फेडररला राेखण्याचा प्रयत्न केला. मात्र, फेडरर यामध्ये वरचढ ठरला. यापूर्वी सलामीला फेडररला पाच सेटपर्यंत झंुज द्यावी लागली. स्वित्झर्लंडच्या १९ वर्षीय फ्रान्सिसने झुंजवले हाेते.  

नंबर वन कॅराेलिना प्लिस्काेवा विजयी 
नंबर वन कॅराेलिना प्लिस्काेवाने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत सहज विजय संपादन केला. तिने लढतीमध्ये अमेरिकेच्या निकाेल गिब्जला पराभूत केले. तिने २-६, ६-३, ६-४ अशा फरकाने विजय संपादन केला. दुसरीकडे १२ व्या मानांकित येलेनाने राेमानियाच्या साेरानाचा पराभव केला. तिने ६-४, ६-४ ने  विजय मिळवला. अाता तिची नजर तिसऱ्या फेरीतील विजयाकडे अाहे.   

सानिया ५५ मिनिटांत विजयी 
सानिया मिर्झाने अवघ्या ५५ मिनिटांमध्ये महिला दुहेरीत विजयी सलामी दिली. तिने चीनच्या पेंग शुअाईसाेबत दुहेरीचा सामना जिंकला. या जाेडीने पेत्रा मार्टिच-डाेना वेकिचवर मात केली. त्यांनी ६-४, ६-१ ने विजय मिळवला.
बातम्या आणखी आहेत...