आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीअभावी सवर्णांची ‘फेलोशिप’ रखडली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच बार्टीने सर्वसाधारण प्रवर्गातील संशोधकांसाठी जाहीर केलेली फेलोशिप निधी नसल्यामुळे रखडली आहे. जाती धर्मांच्या भिंती पाडून समता प्रस्थापित करण्यासाठी ही समता फेलोशिप जाहीर केली आहे. पण संशोधकांचे अर्ज प्राप्त होऊन आठ महिने उलटले तरीही अद्याप निवड यादी जाहीर केलेली नाही.
भीम जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५) वर्षानिमित्त ‘सामाजिक समता आणि न्यायवर्ष-२०१६’ साजरे केले गेले. सर्वहारा समाजातील १२५ संशोधकांना प्रत्येकी लाखांची फेलोशिप देण्याचे बार्टीने नोव्हेंबरमध्ये जाहीर केले होते. ‘दिव्य मराठी’ने डिसेंबर २०१५ च्या अंकात ही बातमी ‘ब्रेक’ केली होती. अनेक वर्षांपासून यूजीसी, आयसीएसएसआर, आयसीएचआर आणि तत्सम संस्था मागासवर्गीय संशोधकांना फेलोशिप देऊन त्यांचे भविष्य घडवत आहे. बार्टीदेखील अनुसूचित जाती आणि जमातींच्या संशोधकांना फेलोशिप देते आहे. मात्र शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून २०१६ वर्षासाठी प्रत्येक घटकातील १२५ निवडक संशोधकांना फेलोशिप दिली जाणार आहे. ५० टक्के महिलांसाठी तर टक्के अपंगांसाठी आरक्षण देण्यात आले आहे. मुलाखतीनंतर ज्यांची फेलोशिपसाठी निवड होईल, त्यांना अतिउच्च कन्फ्युगरेशनचे लॅपटॉप, महत्त्वाचे सॉफ्टवेअर मोफत दिले जाणार आहेत. पण अर्ज येऊन जवळपास आठ महिने उलटले, तरीही बार्टीने अद्याप निवड यादी जाहीर केली नाही. बार्टीच्या अधिकाऱ्यांना विचारले तर राज्य शासनाने पुरेसा निधी दिला नसल्याचे म्हटले आहे.
कायआहे, फेलोशिप..? : एमफिलआणि पीएचडी संशोधकांना दोन वर्षांच्या मुदतीसाठी डॉ. आंबेडकर समता ज्युनियर रिसर्च फेलोशिपअंतर्गत प्रत्येकांना दरमहा २५ हजार रुपये दिले जातील. मानव्य आणि सामाजिकशास्त्र या विद्याशाखेतील संशोधकांना वर्षाला आकस्मिक निधी म्हणून दहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील संशोधकांना १२ ते २५ हजार रुपये वार्षिक दिले जातील. ज्या विभाग, संस्थेत संशोधन सुरू आहे, अशा संस्थांना संशोधकांना पायाभूत सुविधा दिल्या म्हणून संस्थांना दरमहा हजार रुपये दिले जाणार आहेत. अपंग संशोधकांच्या मदतनीसांसाठी दरमहा दोन हजारांची तरतूद केलेली होती.

बार्टीला १५ कोटींची अपेक्षा
नोव्हेंबर-२०१५नंतर किमान दहा वेळा अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिली होती. दरम्यान अडीच हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. त्यापैकी १२५ जणांची निवड केल्यानंतर त्यांना सहा लाखांची फेलोशिप देण्यात येणार आहे. बार्टीने सरकारकडे १५ कोटींची मागणी केलीे. राज्य सरकारने मात्र बार्टीला कोटी ८५ लाख रुपये दिले. एवढ्या रकमेत १२५ जणांना फेलोशिप जाहीर करणे शक्य नसल्यामुळे निवड यादी जाहीर केली जात नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...