आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पोलिस कॉन्स्टेबल, होमगार्ड लाच घेताना चतुर्भुज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तक्रारदाराच्या विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होती. मात्र, पती-पत्नीने आपसात प्रकरण मिटवल्यामुळे महिला पोलिस काॅन्स्टेबलने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच दिली नाही तर गुन्हा दाखल करेल, अशी धमकीही दिली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. याआधारे लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकाने गुरुवारी जिन्सी पोलिस ठाण्याच्या आवारात महिला पोलिस काॅन्स्टेबल, होमगार्डला दीड हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
महिला तक्रार नविारण केंद्रात दाखल झालेली तक्रार मागे घेण्यात आली. समझोता झाल्यामुळे पुढील कारवाई करू नये, अशी तक्रारदाराची अपेक्षा होता; पण पैसे दिल्यास गुन्हा दाखल केला जाईल, अशी भीती महिला पोलिस होमगार्ड देत होते. त्यामुळे तक्रारदार वैतागले आणि त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पथकाने जिन्सी ठाण्याच्या ममता रामसिंग घुसिंगे होमगार्ड मुकरम खान गफ्फार खान यांना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिला वराडे, वैशाली पवार यांनी केली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.