आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

43 वर्षीय महिला सैन्य अधिकाऱ्यावर बलात्कार प्रकरणी चाैघांना जन्मठेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक. - Divya Marathi
प्रतिकात्‍मक.
औरंगाबाद- पुणे येथे लष्करात उच्चपदावर कार्यरत ४३ वर्षीय महिलेचे ६ वर्षांपूर्वी बीड-पुणे रस्त्यावर अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या चौघांना विशेष मकोका न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी जन्मठेेपेची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीवर गंभीर स्वरूपाचे १७ गुन्हे दाखल आहेत.

खटल्याच्या सुनावणीत विशेष वकील नीलिमा वर्तक यांनी ३४ साक्षीदार तपासले. त्यात शेतमजूर महिला, दुचाकीस्वार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दीपक व अभय ला बलात्कारप्रकरणी जन्मठेप व प्रत्येकी १० हजार दंड, लूटमार प्रकरणी दीपक, अभय, विजय बडे व सुनील एखंडला जन्मठेप, प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, अपहरण प्रकरणी चौघांनाही ५ वर्षे सक्तमजुरी प्रत्येकी एक हजार दंडाची शिक्षा ठोठावली.
पीडित महिला पती, १६ वर्षीय मुलगा, वॉचमन व त्याच्या पत्नीसह परळी वैजनाथच्या दर्शनाहून परतताना ११ एप्रिल २०१० च्या रात्री मांजरसुबा घाटातील ढाब्यावर जेवण करत होते. त्यांच्या टेबलच्या काही अंतरावर दीपक जावळे हा अट्टल गुन्हेगार साथीदारांसह जेवण करत होता. त्याची नजर या कुटुंबावर पडली. दीपक जावळे, अभय पोरे, विजय बड व सुनील एखंडे सर्व (रा. शेंडी पोखर्डी, जि. अहमदनगर) या दरोडेखोरांनी महिलेच्या कारचा पाठलाग करून चिंचोडी फाट्याजवळ महिला अधिकाऱ्याच्या गाडीसमोर कार आडवी लावली.

सर्वांना कारच्या खाली उतरवले. पीडित महिला आणि वॉचमनच्या पत्नीच्या अंगावरील दागिने, रोख रक्कम, एटीएम कार्ड हिसकावून घेतले. त्यानंतर महिला अधिकाऱ्यास त्यांच्या कारमध्ये कोंबले आणि दीपक जावळे, अभय पोरे या दोघांनी अाळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर तिला विवस्त्र अवस्थेत धावत्या कारमधून ढकलून दिले होते. या प्रकरणी बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी आरोपींना जेरबंद केले होते.
बातम्या आणखी आहेत...