आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - वाळूज ग्रामपंचायतीकडून गावातील दुर्गंधीयुक्त कचरा सर्रास नगर-औरंगाबाद महामार्गावर टाकला जातो. त्यामुळे वाहनचालकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. मात्र, या समस्येवर थोड्याच दिवसांत मात केली जाणार आहे. या घनकचर्‍यावर प्रक्रिया क रून सेंद्रिय खतनिर्मिती केली जाणार असून या प्रकल्पाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती ग्रामसेवक एस. के. वाघमारे यांनी दिली.

वाळूज ग्रामपंचायतीकडे दहा सफाई क ामगार व दोन घंटागाड्या आहेत. गावातील व्यावसायिक आणि नागरिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. या पिशव्या हवेमुळे उडून सांडपाण्याच्या गटारांमध्ये जाऊन अडकतात. त्यामुळे गटारे स्वच्छ करताना या पिशव्याही सफाई क ामगार उचलून नेतात. गल्लीबोळातील कचर्‍यांचे ढीग उचलून ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीद्वारे नगर-औरंगाबाद महामार्गालगत टाकले जातात.

कचर्‍याच्या ढिगांवर कुत्र्यांच्या झुंडी
या घनकचर्‍यात मटण, मत्स्य विक्रेते टाकाऊ मांसही टाकतात. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी सुटते. मांसाचे तुकडे, हाडे खाण्यासाठी कुत्र्याच्या झुंडीच्या झुंडी जमा होतात. त्यांच्यात नेहमी भांडणे होत असल्याने ही कुत्री मुख्य मार्गावर वाहनांना धडकतात. त्यामुळे अनेकदा दुचाकीस्वार गंभीर जखमी होत आहेत. या ठिकाणांपासून नागरी वसाहती हाकेच्या अंतरांवर आहेत. तेथील घाण, साहित्य, कोंबड्यांची पिसे हवेने उडून अनेकांच्या घरात शिरतात. या परिसरातून केव्हा एकदा पुढे निघतो, असे वाहनचालकांना होते. महामार्गाच्या कडेला मोठय़ा प्रमाणावर कचर्‍याचे ढीग साचले आहेत. हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असल्यामुळे हा प्रकार थांबवण्यात यावा, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. या समस्येवर उपाययोजना म्हणून घनकचरा निर्मूलनाबरोबरच सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रकल्प राबवण्याचा ग्रामपंचायतीने मनोदय केला आहे.

लक्ष्मी गायरानात सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प होणार
गावातील घनकचरा रस्त्यालगत टाकणे योग्य नाही. यासंदर्भात ग्रामपंचायतीने दुसरी एक घंटागाडी घेतली आहे. त्यावर ट्रॉली बसवण्याचे काम सुरू आहे. ही ट्राली बसवल्यानंतर सर्व कचरा लक्ष्मी गायरानमध्ये खड्डा क रून तेथे टाकला जाणार आहे. नंतर या कचर्‍यावर प्रक्रिया क रून तेथे सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. येत्या क ाही दिवसांत ही प्रक्रिया सुरू होणार आहे. - एन. के. वाघमारे, ग्रामसेवक, वाळूज.