आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खत प्रकल्पाच्या प्रश्नाची काेंडी अाज फुटणार...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाेव्हेंबर २०१५ पासून शहरातील बांधकामांच्या परवानगीवरील बंदीला कारणीभूत ठरणाऱ्या खत प्रकल्पाची काेंडी गुरुवारी (दि. १३) स्थायी समिती बैठकीत फुटण्याची अाशा निर्माण झाली असून, खत प्रकल्पाचे कामकाज सुरू करण्यास नवीन ठेकेदाराला स्थायी समिती काम देते की नाही हे बघणे महत्त्वाचे ठरणार अाहे.
नाेव्हेंबर २०१५ मध्ये खत प्रकल्पाच्या दुर्दशेवरून राष्ट्रीय हरित लवादाने शहरातील बांधकाम परवानगी पूर्णत्वाच्या दाखल्यावर निर्बंध लादले. परिणामी, अाधीच मंदीचा सामना करणाऱ्या शहरातील विकसकांची काेंडी झाली. केवळ विकसकच नव्हे तर सर्वसामान्य ग्राहकांनाही त्याचा माेठा फटका बसला. कपाट क्षेत्राचा वाद सुरू असल्यामुळे अाधीच अनेक इमारती पूर्ण असूनही पूर्णत्वाचा दाखला मिळत नव्हता. त्यात अाता कपाटाचा प्रश्न सुटला तरी बांधकाम पूर्णत्वाचा दाखल्यावर बंदी असल्यामुळे ताेंडचे पाणी पळाले हाेते. त्यानंतर महापालिकेने हरित लवादाच्या अटीवरून वास्तविक खत प्रकल्पाचे कामकाज सुरू करणे गरजेचे हाेते; मात्र दीर्घकालीन ठेक्याचे कारण देत ठेकेदाराच्या दराच्या परीक्षणात सहापेक्षा अधिक महिने वाया घातले गेले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अाता काेठे नवीन अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी खत प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर पाठवला अाहे. स्थायी समितीने अभ्यासासाठी मध्यंतरी वेळ मागून घेतला; मात्र स्थायीला नेमका कशात रस अाहे हे उघड झाल्यावर वेगळ्या पद्धतीने उपायासाठी अायुक्तांनी पावले याेजली.
त्यानंतर मध्यंतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने भेट घेत खत प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करण्याची गळ घातली. शहर विकासाशी संबंध असल्यामुळे ठाकरे यांनीही प्रस्ताव मंजूर करण्याबाबत महापालिका पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे अाश्वासन दिले. त्यानुसार स्थायी समिती अाता गुरुवारच्या बैठकीत काय निर्णय घेते हे बघणे महत्त्वाचे अाहे. एकूण, दीर्घकालीन काेंडी फुटण्याची िचन्हे असून, त्याची उत्कंठा लागून राहिली अाहे.

बातम्या आणखी आहेत...