आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Field Spec Hi Res Spectroredi O Miter ' Machine In BAMU University

प्रसाधनांतील "सौंदर्य' शोधणारे यंत्र विद्यापीठात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -पिकांना आवश्यक तेवढ्याच पाण्याच्या गरजेवर मार्गदर्शन करणारे तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये सौंदर्य वाढवणारे घटक कार्यरत आहेत की नाही याचाही भंडाफोड करणारे यंत्र विद्यापीठात उपलब्ध आहे. संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान विभागातील संशोधकांसाठी हे उपकरण उपलब्ध करून दिले आहे. "फील्ड स्पेक हाय-रेस स्पेक्ट्रोरेडि ओमीटर' असे या यंत्राचे नाव अाहे. ४८ लाखांना खरेदी केलेले हे अमेरिकन यंत्र आहे.
भूरचनाशास्त्र, पदार्थशोध, वनीकरण, सागरी किनारपट्टी, पाणवठ्यांचे रिमोट सेन्सिंगद्वारे तथ्यसंकलन करून त्याचे संशोधन अर्थात वर्गीकरण करण्यासाठी हे उपकरण मदत करणार आहे. त्याशिवाय लष्कराच्या स्फोटकांतील ‘कन्टेट’ तपासणे, परिचित्रण करणे आणि सुरुंग शोधण्यासारखी असंख्य संशोधने या उपकरणाद्वारे करता येणे आता सहज शक्य आहे.

फील्डस्पेक यंत्र बहुपयोगी : फील्डस्पेक्ट्रोस्कोपी, भूपृष्ठसत्यता तपासणे, रंगपटासंबंधीचे रिमोट सेन्सिंग, पिके आणि माती संशोधनातही या यंत्राचा वापर करता येणे शक्य आहे. हिम म्हणजेच शहरात पडणाऱ्या बर्फाचे संशोधन, जमिनीवरील पर्यावरणाचे संशोधन, वायुवहित रिमोट सेन्सिंग मापन, वातावरणातील रिमोट सेन्सिंग संशोधन, हवामान बदलाचे विश्लेषण, भूरचनाशास्त्राचा अभ्यास, जलाशयाचे रिमोट सेन्सिंगद्वारे संशोधन, शेतीचे विश्लेषण, कच्च्या मालाची तपासणी, वन उत्पादनांचा अभ्यास, कागद कागदाच्या लगद्याचे विश्लेषण, वातावरणातील आर्द्रतेचे विश्लेषण, जैवइंधनाचे विश्लेषण, जीववस्तुमानाचा अभ्यास त्याचे विश्लेषण, नैसर्गिक उत्पादने आणि पूरक आहारांची सत्यता तपासणे, रासायनिक विश्लेषण, सौंदर्य प्रसाधन आणि उत्पादनांची सत्यता तपासून पाहता येणेही या उपकरणामुळे शक्य होईल.

प्रादेशिक विद्यापीठांमध्ये यंत्र उपलब्ध नाही
देशातीलकाही मोजक्याच आयआयटी आणि एनआयटी संस्थांमध्ये असे यंत्र उपलब्ध आहे. मात्र, प्रादेशिक विद्यापीठांच्या प्रयोगशाळेत सध्या असे यंत्र नाही. ते आपण खरेदी केले असून विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या संशोधनासाठी याचा फायदा होऊ शकतो. डॉ.रत्नदीप देशमुख, विभागप्रमुख

"फील्ड स्पेक हाय-रेस स्पेक्ट्रोरेडिओमीटर'
फसवेगिरी उजेडात आणणार
संगणकशास्त्रविभागाला यूजीसीच्या सॅपअंतर्गत ५२ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असून त्यापैकी ४८ लाखांचे ‘फील्ड स्पेक’ यंत्र खरेदी केले आहे. या यंत्राद्वारे सौंदर्य प्रसाधनांच्या फसव्या जाहिरातींमधून केलेल्या दाव्यांची सत्यताही तपासून पाहता येईल. शिवाय शेतीतील विविधांगी संशोधनासाठी ते उपयोगी ठरत असल्याचे विभागप्रमुख डॉ. रत्नदीप देशमुख यांनी सांगितले.