आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : ‘त्या’ ट्रकचालकाला न्यायालयीन कोठडी, ट्रकमध्ये गोमांस नसल्याचा पोलिसांचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद  - गोमांस विक्रीला नेत असल्याची माहिती मिळाल्यामुळे वेदांतनगर पोलिसांनी पकडलेल्या ट्रकच्या चालकाला  दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, या ट्रकमध्ये गोमांस नसून केवळ जनावरांची कातडी होती, असे आज पोलिसांकडून सांगण्यात आले.  

पैठण रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकमध्ये (डब्ल्यू बी २३ टी ३६८६) जनावरांचे मांस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यातील मांस तपासले असून ते गोमांस असल्याचेही पोलिसांनी पत्रकारांना सांगितले होते. संबंधित ट्रकचालक मोहंमद अक्रम मोहंमद अलाउद्दीन याला अटक करून आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला दोन दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात अाले.  दरम्यान, या ट्रकची संपूर्ण तपासणी केल्यानंतर त्यात मांस आढळले नसून जनावरांची कातडी आहे. ती   कुठून आणली याचा तपास सुरू करण्यात आला आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. हा ट्रक सध्या छावणी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.
 
हे पण वाचा,
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...