आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिडको वाळूज महानगर तीनमधील पन्नास हेक्टरवर ग्रोथ सेंटर उभारणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिडको वाळूज महानगरासाठी पन्नास हेक्टर जागेवर ग्रोथ सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित चारशे हेक्टर जागेची मोजणी भूमी अभिलेख कार्यालय खासगी एजन्सीच्या माध्यमातून पूर्ण केली असून जागेचे नकाशे प्राप्त झाल्यानंतर जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी सांगितले.
मुख्य प्रशासक केंद्रेकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून, सिडकोतील जागांचा विक्री व्यवहार सुलभ करताना प्लॉट लिज डिड केल्यानंतर त्याचे हस्तांतरण करण्याची मुभा त्यांनी सिडको संचालक मंडळाकडून मिळविली आहे. पूर्वी सिडकोतील वैयक्तिक मालकीचा प्लॉट इतरास हस्तांतरित करताना उपरोक्त प्लॉटचे २५ टक्के बांधकाम करणे अनिवार्य होते. आता प्लॉटचे सरळ हस्तांतरण करणे शक्य झाले आहे.
सिडकोने टपरी प्लॉट मोठ्या प्रमाणावर विक्री केले आहेत. ते बांधल्यानंतर त्याचा भोगवटा घेतला नसेल तर त्यासाठी सिडको अतिरिक्त भाडेपट्टा वसूल करत होते. सुधारित नियमाप्रमाणे टपरी प्लॉट सहा वर्षांत बांधण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. उपरोक्त प्लॉटवर अतिरिक्त भाडेपट्टाही घेतला जाणार नसल्याची परवानगी संचालक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आली आहे.
सिडको वासीयांनी आपल्या मालमत्तांना कायदेशीर स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी लीज डीड करून घ्यावे, असे आवाहन मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी केले. सिडकोची सदनिका अथवा प्लॉटच्या मूळ रकमेवर सात टक्के रक्कम भरून नोंदणी कार्यालयातून लीज डीड करून घ्यावी. सिडकोच्या एखाद्या मालमत्तेची मूळ किंमत जर एक लाख रुपये असेल तर सात हजार रुपयांत लीज डीड करून घेता येईल.
ऑनलाईन कराचा भरणा करण्यासाठी वेबसाईट
सिडकोच्या विविध करांचा ऑनलाइन भरणा करणे शक्य व्हावे यासाठीwww.cidconewtowns.gov.in ही वेबसाइट सुरू केली आहे. नवीन नियम, बांधकाम परवानगीसंबंधीची सविस्तर माहिती वेबसाइटवर टाकण्यात आली आहे. वाळूज परिसरातील घरांसाठी कचरा व्यवस्थापनाचा नवीन प्रयोग सुरू केला असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उद्यान विकसित केले आहे.
बातम्या आणखी आहेत...