आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील 50% शेतकरी मूत्रपिंडाच्या विकारांनी त्रस्त, कीटकनाशकांचे दुष्परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तासनतास उन्हात काम करणे, कीटकनाशकांचा अति वापर यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये किडनी फेल्युअरचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण तब्बल ५० टक्क्यांवर गेले असून शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगारांमध्येही तेवढेच प्रमाण आहे. ही बाब गंभीर असून शेतकऱ्यांनी भरपूर पाणी प्यावे, थोडी विश्रांती घेत काम करावे, असा सल्ला मूत्रपिंडविकारतज्ज्ञांनी दिला आहे. 
 
१० सप्टेंबर रोजी एमजीएम महाविद्यालयात मूत्रपिंडविकारतज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद होत आहे. या परिषदेचे निमंत्रक डॉ. सुधीर कुलकर्णी, ऑर्गनायझिंग चेअरमन डॉ. प्रशांत पारगावकर सचिव डॉ. रवींद्र भट्टू, डॉ. सचिन सोनी, डॉ. शेखर शिराढोणकर हे सदस्य कार्यरत आहेत. 
 
परिषदेचे निमंत्रक डॉ. सुधीर कुलकर्णी परिषदेचे समन्वयक डॉ. रवींद्र भट्टू यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, पर्यावरणाचा विपरीत परिणाम किडनीवर होत आहे. किडनी फेल होण्याचे नेमके एक कारण कळले नाही. त्यामुळे या प्रकाराला सीकेडीयू (क्रॉनिक किडनी डिस्रप्टिव्ह ऑफ इटोलॉजी) असे नाव दिले आहे. उन्हात आठ तासांपेक्षा जास्त सलग काम करणे, कीटकनाशकांचा अति वापर करणे, तसेच सेल्फ मेडिकेशन म्हणजेच डॉक्टरांचा सल्ला घेता वेदनाशामक औषधींचे सेवन करणे यासह अति दारू पिणे यामुळेही मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढले अाहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.  
बातम्या आणखी आहेत...