मोबाइलसेवा देणाऱ्या कंपन्या विविध स्कीम्स जाहीर करतात. कधी पैसे भरूनही त्या अॅक्टिव्हट होत नाहीत, तर कधी अचानक पैसे कापले जातात. पण ही रक्कम खूपच थोडी असल्याने त्याबाबत बहुतांश लोक गांभीर्याने घेत नाहीत. पण एक तरुण मात्र आपले १७ रुपये का कापले गेले याचे समाधानकारक उत्तर मिळाल्याने आयडिया कंपनीविरुद्ध संघर्ष करत आहे. कंपनीचे कस्टमर केअर, ग्राहक मंच, ट्रायकडे तक्रार केली. उपोषणही केले. कंपनीने त्याला न्यायालयात खेचले; पण तेथे सुनावणीला गैरहजर राहिल्याने कंपनीला दंडही ठोठावण्यात आला. गेल्या ४ वर्षांपासून सुरू असलेला हा लढा आता न्यायालयात गेला आहे.
अमोल चंद्रकांत मोरे असे या तरुणाचे नाव आहे. त्याचा मुकुंदवाडी परिसरात प्ले-स्टेशनचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षांपासून त्याच्याकडे ९६२३२००७८८ हा आयडियाचा प्रीपेड क्रमांक आहे. जुलै २०११ रोजी सायंकाळी पावणेनऊ वाजता अमोलने २३ रुपये रिचार्ज करून एसएमएस पाठवण्याचा पॅक घेतला. यात पहिले मेसेज ६० पैसे दराने, तर त्यापुढील १०० मेसेज रोज मोफत अशा स्वरूपाची ही योजना होती. पॅक घेतल्याच्या तासांत ही योजना अॅक्टिव्हेट होते, असा नियम आहे. याची व्हॅलिडिटी एक महिन्याची असते.
पुढील स्लाईडवर वाचा, नेमके काय घडले अमोल मोरे सोबत...