आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद महापाैर निवडणूक, शिवसेनेचे त्र्यंबक तुपे, भाजपचे शिंदे स्पर्धेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादच्या महापौरपदाची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेचे त्र्यंबक तुपे युतीचे महापौरपदाचे उमेदवार असे सांगितले जात असतानाच भाजपचे राजू शिंदे यांनी शनिवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीला नवी कलाटणी मिळाली.
शिवसेनेने माघार घेतली नाही तर सर्व दलित नगरसेवकांना एकत्रित करून भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध एमआयएम अशा तिरंगी लढतीची भाजपची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२९ एप्रिल रोजी महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक आहे. बंडखोरांच्या मदतीने युतीने दोन्ही पदे मिळवण्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली. कोणते पद कोणाला याचा फॉर्म्युला निश्चित नसला तरी शिवसेनेकडून महापौरपदासाठी तुपेंचा अर्ज दाखल झाला. उपमहापौरपदात सेनेला स्वारस्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. शिंदे यांनी शहराध्यक्ष भगवान घडामोडे व अन्य पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन अर्ज भरला. यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत तिरंगी लढत होणार नाही. महापौर शिवसेनेचाच होईल, असे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.