आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporator Relative Give Fight To People In Aurangabad

औरंगाबादमध्ये तक्रारकर्त्यांना नगरसेविकेच्या पुतण्याने केली बेदम मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नगरसेविकेची भेट तर विमानतळा जवळील मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनी येथील वॉर्ड क्रमांक ७७ मधील नागरिक कॉलनीतील रस्ता खराब आहे, अशी तक्रार घेऊन शुक्रवारी दुपारी नगरसेविका सविता घडामोडे यांच्या घरी गेले होते. झाली नाहीच उलट त्यांचा पुतण्या अजय घडामोडे याने तक्रार घेऊन आलेल्या महिला व नागरिकांना मारहाण केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या या महिलांना भीती दाखवून पोलिसांनी परत पाठवले.

मूर्तिजापूर येथील रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने रस्त्यात चिखल झाला असून दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, या मागणीचे निवेदन घेऊन चाळीस ते पन्नास महिला आणि नागरिक शुक्रवारी दुपारी नगरसेविका सविता घडामोडे यांच्या निवासस्थानी गेल्या. त्यावेळी त्या घरी नव्हत्या. तेव्हा नगरसेविकांना फोन करून बोलवा, असा आग्रह महिलांनी धरला. तेव्हा घडामोडे यांचा पुतण्या अजय संतापला. त्याने तक्रार घेऊन आलेल्या एका तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलांना देखील ढकलून दिले. त्यात एका महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागला, तर चार महिला जखमी झाल्या.
विशेष म्हणजे या वेळी बापू घडामोडे यांचे भाऊ अतुल घडामोडे घटनास्थळी होते. जखमी नागरिक तक्रार देण्यासाठी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गेले तेव्हा महिलांना भीती दाखवत तुम्ही परवानगी न घेता निदर्शने केली. तुमची देखील चौकशी होईल, असे सांगून पोलिसांनी घाबरून टाकले. अखेर महिला तक्रार न देताच घरी परतल्या. या घटनेत दिनेश परदेशीसह शुभांगी पोतदार, अनिता सुरासे, मनीषा सूर्यवंशी, बेबी निमगावकर या महिला जखमी झाल्या आहेत.

मी मुंबईत आहे
^मी पक्षाच्या कामानिमित्त मुंबईला आलो आहे, तर नगरसेविका या बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी प्रकार घडला. या नागरिकांना कोणीतरी पाठवले आहे. आजपर्यंत असे कधीही झाले नाही. मी परतल्यानंतर स्वत: या प्रकरणाची चौकशी करतो. बापू घडामोडे, नगरसेविकेचे पती व शहराध्यक्ष, भाजप