आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fight In Tow People At Aurangabad Before Election

उमेदवारांच्या भांडणात मतदाराला मारहाण, पैसे वाटण्याच्या आरोपावरून उद्भवला वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुकुंदवाडीतील दोन उमेदवारांच्या भांडणात एका सामान्य नागरिकाला मार खावा लागला. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास अहिल्याबाई होळकर चौकात ही घटना घडली. मार लागलेल्या व्यक्तीचे नाव अशोक नारायण म्हस्के (२९, रा. भारतनगर, गारखेडा परिसर) आहे. उमेदवार कैलास गायकवाड आणि दिग्विजय शेरखाने यांच्यातील राजकीय वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दोघांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दिल्या आहेत.
शेरखाने यांनी केलेल्या आरोपात म्हटले आहे की, मंगळवारी रात्री त्यांचे काही कार्यकर्ते झोपलेले असताना गायकवाड यांच्यासह आलेल्या आठ ते दहा कार्यकर्त्यांनी दहशत निर्माण करत आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. आपल्यालादेखील मारहाण केली.
दोन उमेदवारांच्या भांडणात अशोक नारायण म्हस्के या सामान्य नागरिकाला मार खावा लागला. माराचे पाठीवर उमटलेले वळ.

दिशाभूल करण्यासाठी

^शेरखाने यांनी केलेले आरोप आणि दाखल केलेला गुन्हा खोटा आहे. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी आपल्यावर आरोप लावण्यात आले आहेत. मतदारांनी प्रकरणाची सत्यता पडताळून निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, असे वाटते. कैलासगायकवाड, उमेदवार

माझासंबंध नाही

माझा काहीही संबंध नसताना मला या घटनेत गोवण्यात आले आहे. मी मिस्त्रीकाम करतो, बायको माहेरी आहे. तिला भेटण्यासाठी म्हणून आलो होतो. रात्री १२ च्या सुमारास बदनापूरहून येत असताना मला शेरखाने यांच्या कार्यकर्त्यांनी पकडले आणि तू कैलास गायकवाडचा माणूस असून पैसे वाटत असल्याचा आरोप करत फायटर, बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशोकनारायण म्हस्के, पीडित व्यक्ती