आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • File Criminal Charges Against Hospital Which Rejecting Treatment

उपचार नाकारणार्‍या रुग्णालयांवर फौजदारी दाखल करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - योजना असूनही पोलिस कर्मचार्‍यांचे उपचार नाकारणार्‍या रुग्णालयांवर फौजदारी खटले दाखल करून त्यांची मान्यता रद्द करा. तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये पोलिसांसाठी वेगळी ओपीडीची व्यवस्था करा आदी मागण्या मराठवाडा निवृत्त पोलिस अधिकारी असोसिएशनने गृह विभागाकडे केल्या आहेत. आरोग्य योजना व पोलिस कल्याण निधीची व्यवस्था असूनही पोलिस एका महिला पोलिस कर्मचार्‍याला उपचार घेताना आलेल्या अडचणीवर डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध केले होते.

पोलिस आयुक्तालयातील कर्मचारी सविता भालेराव या कावीळसह अन्य गंभीर आजाराने त्रस्त आहेत. ‘पोलिस कुटुंब आरोग्य योजना’ आणि पोलिस कल्याण निधी या दोन योजना असतानाही त्यांना उपचार घेण्यात प्रचंड त्रास झाला. पैसे थकल्याने बजाज रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला तर पोलिस कल्याण निधीतूनही पुरेसा पैसा न मिळाल्याने कुटुंबाने सोने विकून सविता यांच्यावर उपचार केले. त्यामुळे या योजना कागदावरच असून निधीअभावी केवळ ‘उपचारा’पुरत्याच असल्याचे स्पष्ट झाले. यावर डीबी स्टारने ‘पोलिसांच्या उपचारालाही पैसे नाहीत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या प्रकाराला वाचा फोडली. त्यानंतर पोलिस दलातील विद्यमान व निवृत्त पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी डीबी स्टारकडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.


..तर संघर्ष करू
जनसेवेत अहोरात्र काम करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना हक्काचा उपचार मिळत नाही. पोलिस कल्याण निधी जमवला जातो, पण तोच पोलिसांच्या कल्याणासाठी उपयोगात येत नाही. मग या योजनांचा उपयोगच काय? कर्मचार्‍यांना उपचार नाकारणार्‍या रुग्णालयांवर कडक कारवाई व्हावी, अन्यथा असोसिएशनच्या माध्यमातून संघर्ष करणार. -शांताराम ऊसावंत, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र पोलिस मराठवाडा निवृत्त पोलिस अधिकारी असोसिएशन


असोसिएशन घेणार बैठक
मराठवाडा निवृत्त पोलिस अधिकारी असोसिएशन कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी सरसावली आहे. नेहमी तणावात असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीने दिल्या जाव्यात यासाठी असोसिएशनचे पदाधिकारी, पोलिस आयुक्त संजीव कुमार व घाटीचे अधिष्ठाता डॉ. भोपळे यांची भेट घेणार आहेत.