औरंगाबाद - मादी बिबट्या रेणूच्या पिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत आणि तुमच्यामुळे मनपाची प्रतिमा खराब झाली असे नमूद करीत मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी अखेर प्राणिसंग्रहालयाचे संचालक डाॅ. बी.एस. नाईकवाडे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त रमेश पवार प्राणिसंग्रहालयाचा कारभार हाताळतील.
मार्च रोजी रेणू या मादी बिबट्याच्या तीन पिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १५ तारखेला झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगसेवकांनी नाईकवाडे यांच्यावर कडाडून टीका केली त्यांच्या निलंबनाचा ठराव एकमताने मंजूर केला होता. त्या वेळी उत्तर देताना नाईकवाडे यांनी
आपण निर्दाेष असल्याचे सांगताना माध्यमांनीच हा विषय मोठा केल्याचे म्हटले होते. सभेच्या निर्णयानंतरही त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले नव्हते. शनिवारी सायंकाळी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नाईकवाडे यांच्या निलंबनाचा आदेश काढला. या बाबी नागरी सेवा वर्तणूक नियमाचे भंग करणाऱ्या असून आदेश निघाल्या तारखेपासून आपणास निलंबित करण्यात येत आहे विभागीय चौकशी करणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
अकार्यक्षमतेचाही ठपका
डॉ.नाईकवाडेंवर काहीही करता अनेक तज्ज्ञांची मदत घेतल्याचे अहवालात अापण म्हटले आहे. यावरून आपण कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नसल्याचे दिसून आले. याशिवाय मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
काय म्हटले आदेशात
आयुक्तांनी निलंबनाच्या आदेशात म्हटले की, रेणू आणि राजाला हेमलकसाहून आणताना त्यांची निगा राखण्यात आली नाही. औरंगाबादेत तपासणी केल्यावर रेणू गरोदर नसल्याचे समोर आले. मार्चला आपल्या निष्काळजीपणामुळे आणि अज्ञानामुळे रेणूची मुदतपूर्व प्रसूती झाली. औषधांच्या माऱ्यामुळे तिला आपल्या पिलांना दूध पाजता आले नाही. पिलांना इतर मार्गाने अन्नपाणी दिल्याने ही पिले दगावली.