आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Financial Ban On Kopergaon's Mahtma Gandhi Trust

कोपरगावच्या महात्मा गांधी ट्रस्टवर आर्थिक निर्बंध; दिग्गज नेते कोल्हे, काळे यांचा ट्रस्टमध्ये समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिर्डी रस्त्यावरील ५० एकरांवर जमिनीवरील कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या कोपरगावातील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांवर औरंगाबाद खंडपीठाने निर्बंध घातले आहेत. नगरच्या सहधर्मादाय आयुक्तांना प्रतिवादी करण्यात आले असून, त्यांना ट्रस्टच्या व्यवहारासंबंधी खुलासा करण्याचे आदेश बी. पी. धर्माधिकारी व न्या. ए. एम. बदर यांनी दिले आहेत. ट्रस्टने ५० एकर ३३ गुंठे जागा स्वत:ची असल्याचे भासवून अनेक वर्षांपासून त्याचा लाभ घेतला. शॉपिंग कॉम्प्लेक्स, मंगल कार्यालय, ज्ञानमंदिर, आयटीआय कॉलेज, श्रीसाईबाबा मंदिर, सैनिकी मुलांचे वसतिगृह आदींची उभारणी करून कोट्यवधींची लूट केल्याचे याचिकेत नमूद आहे. शासन व जिल्हा परिषदेची ट्रस्टने दिशाभूल केली. ट्रस्टमध्ये माजी खासदार स्व. शंकरराव काळे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आमदार अशोक काळे आदींचा समावेश असल्याने तक्रारी देऊनही कारवाई झाली नाही. जागा शासनाची असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही उपयोग होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी ट्रस्टकडून जागेच्या मागणीसाठी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.

गैरव्यवहार नेमका काय आणि कोर्टाचे आदेश असे
परवानगीचे प्रश्नचिन्ह
पन्नास एकर जागेत विविध इमारती उभ्या करताना सहधर्मादाय आयुक्तांची रीतसर परवानगी घेतल्याबाबत समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. साठ महिन्यांच्या काळात ट्रस्टने गाळे वाटप केले. पण आयुक्तांनी परवानगी घेतल्याचे स्पष्ट केले नसल्याचे कोर्टाचे मत आहे.

विश्वस्तांची माहिती द्या
ट्रस्टने १९७६ पासून विश्वस्तांची नावे सादर करावीत. ५० एकर ३३ गुंठे जागेवरील बांधकामांसंबंधी खुलासा करावा. ट्रस्टच्या पदाधिका-यांशी व्यवहार करण्यास प्रतिबंध आहेत. पुढील आदेशापर्यंत ट्रस्टचा धनादेश कुठल्याही बँकेने वटवू नये, असे अध्यक्ष व सचिवांनी बँकांना कळवावे.