आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे शोधा; जिल्हाधिकारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- आत्मा अंतर्गतअधिकारी सदस्यांची समिती नेमुन या समितीने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांची भेट घ्यावी. आर्थिक, मानसिक, कौटूंबिक सामाजिक पार्श्वभूमीचा अभ्यास करून तसा अहवाल सादर करावा. अहवालानूसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगीतले. 
कृषी विभागाअंतर्गत कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करण्याकरीता ‘आत्मा’ प्रकल्पाच्या जिल्हा नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी राम बोलत होते. बैठकीस जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, मानवलोकचे डॉ.द्वारकादास लोहिया, आत्माचे संचालक भास्कर कोळेकर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी,प्रगतीशील शेतकरी सदस्य उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी राम म्हणाले की,बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गरजा आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेवून कृषी विभागाने कृषी विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजे आत्मामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी विकासाच्या परंपरागत योजनांशिवाय स्थानिक गरजा भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन जास्तीत जास्त फायदेशीर शेतीबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. पुढे ते म्हणाले की, जिल्ह्यात पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. 

भुगर्भातील पाण्याची पातळी वाढली. पाण्याच्या मुबलकतेमुळे पिक परिस्थितीही चांगली राहणार असतांना जिल्ह्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात झालेल्या शेतकरी आत्महत्या सर्वांना चिंताग्रस्त करणाऱ्या आहेत . परिस्थितीत सुधारणा झाली तरी शेतकरी आत्महत्या का झाल्या आहेत याचा प्रत्यक्ष कुटूंबियांना भेटून कारण मिमांसा करण्याची गरज आहे. यासाठी आत्माअंतर्गत प्रमुख अधिकारी सदस्यांची समिती नेमण्यात यावी. यावेळी तूर खरेदी केंद्राच्या कामकाजाचा तसेच विविध कृषीविकास योजनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. शासनाने प्रत्येक जिल्ह्याला कृषी महोत्सव आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी आत्माअंतर्गत झालेल्या खर्चाचा पुढील नियोजनाचा आढावा सादर करण्यात आला. 

एप्रिलमध्ये बीडमध्ये होणार कृषी मेळावा 
एप्रिलमध्येबीड येथे भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये अन्न धान्य विक्री, प्रदर्शन, मेळावा या उपक्रमांचा समावेश असणार असून हा महोत्सव पाच दिवस भरणार आहे. यासाठी या बैठकीत प्राथमिक चर्चा करण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...