आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसऱ्याशी लग्न केल्याने महिलेची फेसबुकवर बदनामी करणाऱ्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/परभणी- पूर्णा येथील महात्मा फुले नगरमधील एका 20 वर्षीय महिलेची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी नांदेड येथील चौघांजणाविरूद्ध कोर्टाच्या आदेशावरून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पिडीतेने दुसऱ्याशी लग्न केल्याचा राग मनात धरून या चोघांनी हे कृत्य केले असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

आपल्याशी विवाह न केल्याने नांदेड येथील शेख इम्रान शेख इसाक व शेख इशरत शेख इसाक या दोघांनी त्यांना 20 ते 27 ऑक्टोबर 2017 या कालावधीत मोबाईलवर फोन करून शिवीगाळ केली. शेख इम्रान शेख इसाक याने पिडीत महिलेच्या पतीच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लील भाषा वापरत महिलेची बदनामी केली. 

 

यासोबतच पिडीतेचा संसार उद्धवस्त करण्याच्या हेतूने शेख इसाक शेख मुसा व शेख वसीम शेख इसाक यांनीही फेसबुकवर पिडीत महिला व तिच्या बहिणीवर आरोप लावत बदनामी केली. याप्रकरणी पिडीत महिलेने पूर्णा कोर्टात धाव घेतली होती़ कोर्टाने गुरुवारी (दि. 23) दिलेल्या निकालावरून पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शेख इम्रान शेख इसाक (रा देगलूर नाका नांदेड), शेख इशरत शेख इसाक, शेख इसाक शेख मुसा, शेख वसीम शेख इसाक (सर्व रा. हैदरबाग देगलुर नाका, नांदेड) या चौघांविरूद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहन मंडले करत आहेत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...