आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fir Register In Police Station Of Vaijapur To Mla R M Wanis Against

शिवसेनेचे आमदार आर.एम.वाणींविरुद्ध गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नांदूर मधमेश्वर कालव्याचे पाणी सोडण्यावरून आमदार आर. एम. वाणी यांनी 'नांमका'च्या अधिकार्‍यांना गुरुवारी दुपारी मारहाण केली. या प्रकरणी उपविभागीय अभियंता कारभारी धात्रक यांच्या फिर्यादीवरून वाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कालव्याचे पाणी वैजापूर आणि गंगापूर या दोन्ही तालुक्यांना सोडले जाते. मात्र, वैजापूरला पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. गुरुवारी धात्रक व नांमकाचे इतर अधिकारी तपासणीसाठी गेले असता भग्गाव शिवारात पाणी उपसा चालू असल्याचे आढळून आले. त्यांनी तो त्वरित बंद केला. याबद्दल शेतकर्‍यांनी आमदार वाणी यांच्याकडे तक्रार केली होती. वाणी यांनी अधिकार्‍यांना घरी बोलावून मारहाण केली, असे तक्रारीत नमूद आहे. याविषयी आमदार वाणी यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.