आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मक्रणपूर येथे दुकानाला आग; तीन लाख रुपयांचे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - तालुक्यातील मक्रणपूर येथील मधुकर जाधव यांच्या कन्नड-औरंगाबाद रोडलगत असलेल्या संतोषी किराणा दुकानास पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. लागलेल्या आगीत तीन लाखांच्या जवळपास नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

शेख आवेस शेख गौस, गोरख पाटील, अशोक नागरे, विशाल जाधव, संतोष पाटील, विजय जाधव, यमाजी वणे, तय्यब शहा, संतोष पाटील, विलास जाधव, ऋषिकेश नागरे, नंदू ओलांडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती गोरख पाटील यांनी पोलिस ठाण्यास व नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर नगराध्यक्ष कोल्हे यांनी नगर परिषदेची अग्निशमन दलाची गाडी आग विझविण्यास पाठवली.
बातम्या आणखी आहेत...