आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीच्या धडकेत अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हडको येथील सुजाता हाउसिंग सोसायटीत राहणारे अनिलकुमार गोविंद मगरे (43) यांचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. जळगाव रोडवरील एसबीओए शाळेजवळ दुभाजक ओलांडताना त्यांना समोरून आलेल्या वाहनाने धडक दिली.

अग्निशमन दलाच्या चिकलठाणा कार्यालयात ते फायर फायटर म्हणून कार्यरत होते. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मागील पंधरा वर्षांपासून मगरे अग्निशमन दलात कार्यरत होते. जळगाव रोड येथील दुभाजक ‘शॉर्टकट’ घेण्यासाठी जागोजागी तोडून ठेवलेले आहे. या दुभाजकाने दोन महिन्यांपूर्वी एका वृद्ध इसमाचाही बळी घेतला होता.

दरम्यान, घटनास्थळावर सायंकाळी साडेसात वाजता मोठा जमाव जमला होता. जमाव पांगवण्यासाठी सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवा ठाकरे यांनी पर्शिम घेतले. एसबीओए शाळेच्या समोर मांसविक्री करणार्‍यांनाही हुसकावून लावण्याची मागणी संतप्त जमावाने केली. अनिलकुमार यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक भाऊ, चार बहिणी, दोन मुले असा परिवार आहे.