आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अग्निशमन’च्या १८ जागा भरणार,फटाका मार्केट आगीच्या घटनेनंतर मनपा प्रशासनाला जाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिवाळीत औरंगपुऱ्यातील फटाका मार्केटला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मनपाच्या अग्निशमन विभागाला एकही दुकान वाचवता आले नाही. त्यामुळे विभागप्रमुखाला निलंबितही करण्यात आले होते. या विभागात कर्मचारी कमी असल्याचा युक्तिवादही करण्यात येत असल्याची दखल घेऊन मनपा प्रशासनाने रिक्त जागांपैकी १८ जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.

महानगरपालिकेकडून दोन वर्षांत आतापर्यंत एकही नवीन पद भरती करण्यात आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा भार येत आहे. दरम्यान, मनपाने खासगी ठेकेदारांमार्फत ३५० कर्मचारी भरती करण्याचे संकेत दिले आहेत.
मात्र, महत्त्वाच्या विभागात आऊटसोर्सिंगचे कर्मचारी ठेवण्याऐवजी मनपाच्या सेवेतच कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अग्निशमन विभागात १८ नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. सध्या या विभागात १० कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी एक स्टेशन मास्तर, तर इतर कर्मचारी आहेत. यातून स्टेशन मास्तर यांच्या निवृत्तीस तीनच महिने राहिले आहेत. शिवाय अन्य काही कर्मचारीही दोन वर्षांत निवृत्त होणार असल्याने मनपाने रिक्त असलेल्या भविष्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची जागा भरण्यासाठी नवीन पद भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रविवारी वर्तमानपत्रात जाहिरातही देण्यात आली आहे. दोन महिन्यांत नवीन पद भरती प्रक्रिया पार पडण्याचे संकेत मनपाच्या सूत्रांनी दिले असले तरी अजून किमान तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.

जळीत कांडानंतर आली जाग : मनपाच्याअनेक विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्याकडे अद्याप लक्ष देण्यात आले नाही. मात्र, फटाका मार्केटला लागलेल्या आगीनंतर प्रशासनाला जाग आली आहे. त्यामुळे ही नवीन पद भरती करण्यात येत आहे. इतर विभागातील कर्मचाऱ्यांची भरतीही वेळीच केली नाही तर भविष्यात आणखी अप्रिय घटनांना प्रशासनाला सामोरे जावे लागण्याची शक्यता मनपात वर्तवण्यात येत आहे.

अन्य सुविधांची गरज
महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात नवीन पद भरतीमुळे अडचण दूर होणार असली तरी या विभागात इतर उपकरणांची वानवा आहे. सात बंब कार्यरत असले तरी पाण्याची समस्या नेहमीच आगीच्या ठिकाणी सतावत असते. आपत्ती व्यवस्थापनासाठी मनपाकडे आवश्यक साधनसामग्री नाही.
बातम्या आणखी आहेत...