आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२४ तास ड्युटी, अग्निशमन कर्मचारी होरपळताहेत, तीन कार्यालयांचा भार केवळ ४१ कर्मचाऱ्यांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एक तर २४ तास ऑन ड्युटी, ओव्हरटाइमचा मोबदला नाही, हक्काची रजाही मिळत नाही... त्यातच कमी मनुष्यबळामुळे पडणारा ताण पाहता शहरातील औद्योगिक अग्निशमन विभागातील कर्मचारी जणू आगीमध्ये होरपळत आहेत. वाळूज एमआयडीसीतील स्टेशनमध्ये ३६ कर्मचाऱ्यांची गरज असताना फक्त १४ कर्मचारी आहेत. पैठणमध्ये ३२ ची आवश्यकता आहे, पण आहेत १०. हीच गत शेंद्रा औद्योगिक वसाहतीची. येथे तब्बल ५० कर्मचाऱ्यांची गरज असताना फक्त १७ लोक आहेत. तिन्ही ठिकाणी एकूण ११८ कर्मचारी हवे असताना फक्त ४१ कर्मचाऱ्यांवरच काम भागवले जात आहे. म्हणजेच येथील अग्निशमन विभागात कर्मचाऱ्यांच्या तब्बल ६५ टक्के जागा रिक्त आहेत. त्यांचा भार या कर्मचाऱ्यांवर पडतो.
ओव्हर टाइमचा मोबदला नाही
अग्निशमनविभागातील बहुतांश कर्मचारी या त्रासाला कंटाळले आहेत. त्यांना तास काम केल्यानंतरही स्टेशनवरच थांबावे लागते. ओव्हरटाइमचा मोबदला दिला जात नाही.
{हीच बाब रजांची. हक्काच्या रजादेखील या कर्मचाऱ्यांना दिल्या जात नाहीत. मनुष्यबळ कमी असल्याने एक दिवसाची सुटी जरी दिली तरी एक दिवसात गावी जाऊन येणे शक्य होत नाही. काहींचे कुटुंब बाहेरगावी असल्याने त्यांना भेटायलाही जाता येत नाही.
{आपल्या देशात प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. पण मनुष्यबळ कमी असल्याचे कारण सांगून मतदानालाही जाऊ दिले जात नसल्याचा प्रकार घडल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
{ चार वाहने, दोनच चालक शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन कार्यालयात अग्निशमन दलाच्या मोठ्या गाड्या, रुग्णवाहिका आणि बोलेरो (छोटी गाडी) अशा एकूण चार गाड्या आहेत. यासाठी फक्त ड्रायव्हर आहेत. आणीबाणीच्या वेळी ड्रायव्हर चार गाड्या कशा चालवणार? त्यापैकी एकजण रजेवर असेल तर एकच ड्रायव्हर उपलब्ध असतो, अशी माहिती वाहनचालक अरविंद चौधरी यांनी दिली.

या कर्मचाऱ्यांना काम कमीच असते...
या कर्मचाऱ्यांना फार कमी काम असते. महिन्याचे २० दिवस हे कर्मचारी बसूनच असतात. आता वर्षांनंतरच कर्मचाऱ्यांची बदली केली जाते. म्युच्युअल बदली होऊ शकते, परंतु विनंती बदली करता येत नाही. कर्मचारी तास फक्त बसून असतात. कॉल येण्याचे प्रमाणदेखील कमी आहे. आमच्या विभागात कर्मचारी संख्या कमी आहे. ही बाब उद्योगमंत्र्यांनाही माहीत आहे. त्यावर चर्चादेखील झाली आहे. वर्षभरात रिक्त जागा भरण्यात येणार असून या कर्मचाऱ्यांच्या समस्यादेखील सोडवल्या जातील. एस.पी. गायकवाड, विभागीयफायर ऑफिसर

मोबदलाही मिळत नाही
कामावरअसलेल्याकर्मचाऱ्यांना २४ तास काम करावे लागत असले तरी मोबदला मिळत नाही. चार वाहनांसाठी दोनच चालक आहेत. सुरेशगायकवाड, वाहनचालक

न्याय मिळत नाही
अग्निशमनविभागातीलकर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या अधिकाऱ्यांसह मंत्र्यांपर्यंत मांडल्या. मात्र, न्याय मिळत नसल्याने त्यांच्या मानसिकतेत बदल होत आहे. प्रशांतगोसावी, कर्मचारी

राज्यातही अशीच परिस्थिती
राज्यभरातील औद्योगिक अग्निशमन विभागांमध्ये जवळपास ६५ टक्के कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना २४ तास ऑन ड्युटी राहावे लागत आहे. आगीमध्ये होरपळत आहे. येथील कर्मचाऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील २८ कार्यालयांचा भार केवळ ३२५ कर्मचाऱ्यांवर आहे.

ही माझीच जबाबदारी
औद्योगिक अग्निशामक विभागात समस्या आहेत ही बाब खरी आहे, त्यासाठी मी आधीच या विभागातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात, असा आदेश दिला होता. पण त्यानंतर देखील इतक्या दिवसात या कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागल्या नसलतील तर या विभागाचा मंत्री म्हणून ती माझीच जबाबदारी आहे, संबंधित कर्मचाऱ्यांनी पुन्हा माझ्याशी संपर्क साधावा, मला भेटावे मी तत्काळ चौकशी करून पुढील कारवाई करतो आणि आश्वासन देतो की या कर्मचाऱ्यांच्या समस्या मी नक्की सोडवणार. सुभाषदेसाई, उद्योगमंत्री

पत्नीला अर्धांगवायूचा झटका आला. गेल्या सात महिन्यांपासून तिला उपचाराची गरज आहे. त्यामुळे विभागाकडे बदलीचा अर्ज केला, पण त्याबाबत सहानुभूतीने विचार करता फक्त दोन महिन्यांची तात्पुरती बदली देण्यात आली. त्यानंतर पुन्हा औरंगाबादेत कार्यरत होण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे सध्या पत्नीजवळ बसायला कुणीही नाही. त्यामुळे भयंकर हाल होत असल्याचे वाळूज येथील अग्निशमन दलात कार्यरत असलेले प्रशांत गोसावी यांनी सांगितले.
पत्नी गरोदर आहे. लवकरच बाळ जन्माला येणार आहे. मात्र, अनेकदा रजेसाठी अर्ज करूनदेखील विभागाने रजा मंजूर केली नाही. गेल्या महिन्यांपासून एकदाही पत्नीसोबत रुग्णालयात जाता आले नाही. किमान अपत्याच्या जन्माच्या वेळी तरी आपण तेथे असावे, असे कुणालाही वाटते. पण या विभागामध्ये तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याचे अग्निशमन कर्मचारी पंकज कोलते यांनी त्यांची ही व्यथा अत्यंत काकुळतीने सांगितली.

पत्रकारांशी बोलल्यास मिळतो मेमो
पत्रकारांशी बोलले किंवा त्यांच्यासमोर आपले प्रश्न मांडले, तर या कर्मचाऱ्यांना मेमो दिला जातो. खोटी कारणे पुढे करून कार्यालयीन कारवाया केल्या जातात. त्यामुळे हे सगळेच प्रकार आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्याने आम्ही आमचा त्रास मांडणार तरी कुणाकडे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. विविध ठिकाणची आग विझवत असताना आमच्याच विभागात वणवा लागल्यासारखी परिस्थिती असल्याचे हे कर्मचारी म्हणतात. ही व्यथा आहे औरंगाबाद शहरातील औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन विभागातील दोन कर्मचाऱ्यांची. ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे असली तरी शेंद्रा, वाळूज आणि पैठण एमआयडीसीतील तिन्ही अग्निशमन केंद्रांतील ४१ कर्मचाऱ्यांचे कमी अधिक प्रमाणात हेच हाल आहेत. महत्त्वाच्या कारणांसाठीही सुटी मिळत नाही. बारा महिने अन् चोवीस तास फक्त अग्निशमन केंद्रच त्यांच्यासमोर असते.