आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराला आग,कापसासह साहित्य खाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज - वैजापूर तालुक्यातील  धोंदलगाव येथील शेतकरी गोरख रायभान लोंढे यांच्या कुडाच्या घराला आग लागल्याने शेतमालासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही  घटना गुरुवारी, दि. २३ रोजी पाचच्या सुमारास घडली.    

 या आगीत २० क्विंटल कापूस, १० क्विंटल बाजरी, ४ क्विंटल गहू, भुईमुगाच्या शेंगा १ क्विंटल, तूर २ क्विंटल, २० हजार रुपयांचे शेतीउपयोगी अवजारे,  मुलाची शिक्षणाची कागदपत्रे, महिलेचे दागिने याबरोबरच बैलजोडी घेण्यासाठी गुरुवारीच बँकेतून काढलेल्या रोख ५० हजार रुपयांच्या रकमेसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. 

ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. मात्र, सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. शेतमालासह संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याने लोंढे कुटुंबाला प्रशासन आणि दानशूरांनी मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
 
बातम्या आणखी आहेत...