आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तांडव: आगीत कपड्यांचे गोडाऊन भस्मसात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: औरंगपुरा चौकातील नम्रता कलेक्शन या कापड दुकानाचे गोडाऊन मंगळवारी सायंकाळी लागलेल्या आगीत भस्मसात झाले. गोडाऊनलगतच्या इमारतीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी साडेचार तास झुंज देत आग आटोक्यात आणली. रात्री उशिरा पंचनामा करण्यात आला. त्यात अडीचलाख रुपयांचे कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे म्हटले आहे. आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही. बघ्यांच्या गर्दीमुळे ट्रॅफिक जाम झाला होता.
औरंगपुरा पोलिस चौकीसमोर शंभर वर्षांपूर्वीची तीनमजली इमारत आहे. त्यातील खालच्या मजल्यावर नंदकुमार मुळे यांचे नम्रता कलेक्शन हे कपड्यांचे दुकान आहे. त्यांनी पहिल्या, दुसर्‍या मजल्यावर कपड्यांचा साठा ठेवला होता. गेल्या दीड वर्षापासून त्यांनी दुकान बंद केले होते. आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुकानाच्या शटरमधून अचानक धूर येऊ लागला. दुकानाशेजारी असलेल्या राज ड्रेसेसचे मालक नरेश तनवाणी यांनी ते पाहताच तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधला. तोपर्यंत आगीच्या ज्वाळा भडकण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत नगरसेवक गोपाळ कुलकर्णी यांनी या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील पत्रे उचकटवले. परिसरातील नागरिकांकडून हंडे, बकेटातून पाणी मागवून त्याचा मारा सुरू केला. पाच-सात मिनिटांतच अग्निशमन दलाचे चार बंब, सहा टँकर घटनास्थळी दाखल झाले.