आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकलठाण्यातील बंद कंपनीला लागली आग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चिकलठाणा एमआयडीसीतील शिंदीबन परिसराच्या जवळ असलेल्या एका बंद कंपनीला आग लागल्याची घटना दपारी अडीचच्या समारास घडली. भंगार मालाला लागलेली आग विझवण्यासाठी रात्रीचे आठ वाजले होते. अशी माहीती अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दपारी अडीचच्या समारास प्लॉट क्रमांक २८ येथील बंद कंपनीतून धूर येत असल्याचे स्थानिकांनी पाहीले. पहाता पहाता या ठिकाणी असलेल्या भंगार सामानाने पेट घेतला. स्थानिकांनी तात्काळ अग्नीशमन विभागाला फोन करुन सांगितले. अग्नीशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यामळे मोठी दर्घटना टळली. रात्री आठ वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सरु होते. या घटनेत जीवीत हानी झाली नसल्याचे समोर आले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहीती नसार हा प्लॉट तायल आणि प्रेम तोतलच्या नावावर असल्याचे सांगितले. तर अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीती नसार प्लॉट एकाचा, कंपनी एकाची आणि माल दसऱ्याचा असल्याचे कळते.
आग विझवण्यासाठी तीन बंब चार खाजगी टँकर लागले. एस. के भगत, वैभव बाकडे, सोमनीथ भोसले, किशोर कोळी या अग्नीशमन विभागाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
बातम्या आणखी आहेत...