आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी कार्यालयात शॉर्टसर्किटने लागली आग, कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहाच्या इलेक्ट्रिक पॅनलला सोमवारी दुपारी सव्वा एक वाजता आग लागली. मात्र कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अवघ्या दहा मिनिटांत आग आटोक्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे आग विझविण्यासाठी लावलेल्या फायर एक्स्टिंग्विशरची मुदत पाच महिन्यांपूर्वीच संपल्याचे उघड झाले आहे. 
 
सोमवारी लोकशाही दिन असल्यामुळे मोठी गर्दी होती. दुपारी सव्वा एक वाजता सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी यू. आर. भगत यांना नियोजन सभागृहाजवळील विद्युत बोर्डला आग लागल्याचे दिसले. त्यांनी सूचना देऊन नागरिकांना बाहेर काढल्यानंतर उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, लिपिक मीर जफर अली यांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. कटके यांनी फायर एक्स्टिंग्विशरची पीन काढून ते लिपिकाच्या हातात दिले. त्यानंतर अली यांनी स्टूलवर चढून इलेक्ट्रिक पॅनलवर लागलेल्या आगीवर त्याचा मारा सुरू केला. त्यानंतर सभागृह तसेच आजूबाजूला सर्वत्र धूर झाला. माहिती मिळताच दहा मिनिटांत अग्निशमन विभागाची गाडी आली. तोपर्यंत आग विझली होती. दरम्यान, नियोजन सभागृहात काही अडचण आल्यास बाहेर पडण्यासाठी दुसरा रस्ता आहे. मात्र हा रस्ता बंद अाहे. सभागृहाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपये निधी मंजूर आहे. मात्र अजूनही काम सुरू झाले नाही. 
 
सार्वजनिक बांधकाम, महावितरणची आज बैठक : यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खाते, महावितरणच्या अधिकाऱ्याची मंगळवारी बैठक घेण्यात येणार आहे. आगीची घटना घडू नये म्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा होईल. 
 
मुदत संपलेले ५९ सिलिंडर 
जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर १८, पहिला मजला १४, दुसऱ्या मजल्यावर २७ असे ५९ फायर एक्स्टिंग्विशर आहेत. या सर्वांचीच मुदत जुलै २०१७ मध्ये संपली. ३० ऑक्टोबरला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मनपाच्या अग्निशमन विभागाला सिलिंडर रिफिल करून देण्याची मागणी केली होती. मात्र अजूनही ते मिळाले नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी म्हणाले. 
 
पुढील स्‍लाइडवर... आग आटोक्‍यात आणणारे मीर जफर अली.
बातम्या आणखी आहेत...