आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील अग्नितांडवाची मुंबईच्या पथकाकडून पाहणी,10 कोटींंचे नुकसान, 2 दिवसांत अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा परिषदेच्या मैदानावर फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्यानंतर रविवारी सकाळीच मुंबईच्या पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संस्थेचे उपनियंत्रक सौमित्र रायचौधरी यांच्या पथकाने औरंगाबादेत येऊन घटनास्थळाची पाहणी केली.

रात्री उशिरापर्यंत महसूल, पोलिस विभागाच्या ६० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जळालेल्या दुकानांचा पंचनामा केला. १४० दुकानांचा वेगळा पंचनामा करण्यात आला असून नुकसानीची रक्कम दहा कोटींंपर्यंत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सौमित्र रायचौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेल्या पाहणीत हाती आलेले पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून दोन दिवसांत अहवाल अपेक्षित असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पुढील स्लाइडवर वाचा, ठिणगीने फटाका बाजार बेचिराख, अग्निशमन प्रमुख शिवाजी झनझन निलंबित आणि पाहा, भीषण आगीचे PHOTOS...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...