आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत अग्नितांडव: ठिणगीने फटाका बाजार बेचिराख, अग्निशमन प्रमुख शिवाजी झनझन निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा परिषदेच्या मैदानावरील फटाका बाजाराला शनिवारी सकाळी ११.४० वाजता लागलेल्या आगीत १४० दुकानांसह ८८ दुचाकी, १३ चारचाकी खाक झाल्या. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. एकूण १० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा आरोप दुकानदारांनी केला असला तरी प्रत्यक्षदर्शींनुसार शेजारी फुटलेल्या फटाक्याची ठिणगी पडली आणि आग भडकली. दरम्यान, या प्रकरणी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख शिवाजी झनझन यांचे निलंबन करण्यात आले आहे. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी रात्री उशीरा ही कारवाई केली.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, नेमके कारण कळल्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल. दरम्यान, प्रशासनाने काळजी घेतली नाही. निष्काळजीपणामुळे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली.

दुकान क्रमांक ४६ मध्ये पडली पहिली ठिणगी
४६ क्रमांकाच्या दुकानात पहिली ठिणगी पडताच त्या दुकानदाराने तेथून पळ काढला. ते पाहून इतर दुकानदार, ग्राहक पळत सुटले. त्यामुळे गोंधळ उडाला. दुकानदार, लोकांनी अग्निशमन दलाला फोन केल्यावर १५-२० मिनिटांनी बंब पोहोचले. तोपर्यंत बाजाराला आगीने वेढले होते. रात्री उशिरापर्यंत दुकाने, जळालेल्या वाहनांचे पंचनामे सुरू होते.

अग्निशामक दलाची बेफिकिरी नडली
२६ वर्षांपासून औरंगाबादच्या मध्यवर्ती भागातील जिल्हा परिषद मैदानावर फटका बाजार भरतो. यंदा १७९ जणांनी अर्ज केले होते. १४० जणांनीच दुकाने सुरू केली होती. फटाका विक्रेता संघटनेने मनपा, पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्रही घेतले होते. त्यानुसार मैदानावर अग्निशमन दलाचे दोन बंब ठेवणे अत्यावश्यक होते. प्रत्यक्षात तेथे एकही बंब नव्हता.

अप्पर जिल्हाधिकारी करणार चौकशी
अप्पर जिल्हाधिकारीयाची चौकशी करतील. दोन तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पंचनाम्यासाठी पथके तयार आहेत. - निधी पांडेे, जिल्हाधिकारी
पुढील स्लाइड्सवर पाहा, भीषण आगीचे PHOTOS...अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...