आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळाच्या गोदामाला आग लागून साहित्य खाक, गोळेगाव बसस्थानकावरील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोळेगाव- येथे फळाच्या गोडाऊनला आग लागून अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. गोळेगाव बसस्थानकावर निसार सय्यद नूर बागवान यांचे फळाचे गोडाऊन आहे. अचानक गोडाऊनला आग लागली. या आगीत गोडाऊनमध्ये त्याच्या मुलीच्या लग्नाचे साहित्य होते. या साहित्यात पलंग, सोफासेट, किराणा सामान, फळे तसेच २१० रुपये किमतीचे ३५४ कॅरेट आगीत खाक झाले. निसार बागवान यांच्या मुलीचे सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न असून बागवान यांनी मुलीस भेट देण्यासाठी संसारोपयोगी साहित्य आपल्या गोडाऊनमध्ये ठेवले होते. 

शुक्रवारी गोळेगाव येथील आठवडी बाजार असल्यामुळे शनिवारी सकाळी बाजारपट्टा झाडून केरकचरा गोडाऊनच्या बाजूला टाकून जाळल्यामुळे ठिणगी उडून गोडाऊनला आग लागली. शेजारीच मशीद, तीन मंदिरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून शाळेच्या भिंतीजवळ आग लागली होती. त्या वेळी शाळेत ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी होते. आग पसरू नये यासाठी ग्रामस्थांनी टँकरने पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत सर्व साहित्य फळे जळून खाक झाली हाेती. त्याच्या बाजूला अलियार खान बागवान यांचेही गोडाऊन जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी भेट दिली निसार बागवान अलियार बागवान यांना प्रत्येकी अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. घटनेचा पंचनामा तलाठी चेतन निर्वाण यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...