आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिन्सीतील गिरणी मैदानावर चार वाहनांना मध्यरात्री लागली आग, सिगारेटमुळे दुर्घटना घडल्याचा संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिन्सीतील गिरणी मैदानावर उभ्या वाहनांना सोमवारी मध्यरात्री अचानक अाग लागली. तासभर वाहने जळत होती. यात तीन वाहने जळून खाक झाली, तर एकाचे नुकसान झाले. सिगारेट, बिडीच्या थोटकाने कचऱ्याने पेट घेऊन वाहनांना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिन्सी पोलिस ठाण्यासमोर असलेल्या गिरणी मैदानावर ही वाहने उभी होती. सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास वाहनांना आग लागल्याचे काही तरुणांना दिसले. त्यांनी तत्काळ अग्निशमन दल पोलिसांना माहिती दिली. अग्निशमनच्या बंबाने चाळीस मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. यात रिक्षा (एमएच २० एटी ४०८८), टेम्पो (एमएच २० ५६१०) आणि ट्रक (एमएच २० सीएस ६४१६) अन्य एक वाहन जळाले. रात्री उशिरापर्यंत काेणीही तक्रार देण्यास आले नसल्याने गुन्हा दाखल नसल्याची माहिती हेड कॉन्स्टेबल दादासाहेब उगले यांनी दिली. 

सुदैवाने मोठी हानी टळली
परिसरात फ्रिज, वॉशिंग मशीनची साहित्य विक्री, दुरुस्तीची दुकाने आहेत. विक्रेत्यांनी त्यांची वाहने मैदानावरच उभी केली होती. वाहनांनी पेट घेताच जवळच असलेले मशीनचे सुटे भाग जळून खाक झाले. रात्री हा परिसर निर्मनुष्य असतो. अनेकदा या ठिकाणी तरुण सिगारेट, गांजा पिण्यासाठी येतात. त्याच वेळी ठिणगीने कचरा पेटून वाहनांना आग लागली असेल, असा अंदाज स्थानि
बातम्या आणखी आहेत...