आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire In Municipality, Commissioner, Deputy Mayor Remove

मनपाला आग! आयुक्त, उपमहापौरांची सुटका !!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बुधवारी(२० एप्रिल) महापालिकेची सर्वसाधारण सभा आटोपली आणि मुख्य इमारतीला अचानक आग लागली. महापौरांच्या दालनाबाहेर धुराचे लोट उसळले, तर छतावरही आगीच्या ज्वाळा उफाळल्या. तिकडे महापौर दालनासमोरच्या विंगवरील तिसऱ्या मजल्यावरही आग लागून धूर पसरला. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी तत्काळ तेथे धाव घेत बचावकार्य सुरू केले. उजवीकडील विंगच्या छतावर अडकलेल्या अायुक्त ओमप्रकाश बकोरिया उपमहापौर प्रमोद राठोड यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी शिडीच्या मदतीने सुरक्षित खाली उतरवले.

या थरारक प्रसंगानंतर अग्निमशमन दलाचा हा बचावकार्याचा सराव संपला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. सायंकाळी वाजून ४५ मिनिटांनी महापालिकेच्या आवारात अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत बचावकार्याची रिहर्सल सुरू केली. महापौरांंच्या दालनासमोर स्मोक बाँबच्या मदतीने धुराचे लोट तयार करण्यात आले. अवघ्या मिनिटभरात हा मजला धुराने भरून गेला. लगेच समोरच्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरूनही धुराचे लोट सुरू झाले. तिकडे छतावर आगीचे लोळ उठले.

मनपाच्या बाहेरून ही आग धुराचे लोट दिसत असल्याने बाहेरच्या शेकडो लाेकांनी आत धाव घेतली मोबाइलवर ही चित्तथरारक घटना टिपण्यास सुरुवात केली. हे सुरू असतानाच सायरन वाजवत अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने आगीचे धुराचे लोट येत असलेल्या भागाकडे धाव घेतली. बाहेरून शिड्या लावण्यात आल्या. शिवाय वरच्या मजल्यावर अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी दोऱ्यांचा वापर सुरू केला. आगीत धुरात अडकलेल्यांना एक-एक करून बाहेर काढण्यात आले.

कापडी शिडीचा वापर : तिकडे सर्वसाधारण सभा संपवून बाहेर आलेल्या नगरसेवकांनी महापौरांसह खाली धाव घेतली, तर आयुक्त बकोरिया उपमहापौर प्रमोद राठोड यांनी समोरच्या इमारतीच्या गच्चीवर धाव घेतली. आग धूर नियंत्रणात आणून बचावकार्य सुरू असताना तिकडे आयुक्त उपमहापौर राठोड असलेल्या गच्चीवरून कापडी शिडी लावण्यात आली. बोगद्यासारख्या या शिडीतून आधी आयुक्त बकोरिया पाठोपाठ उपमहापौर राठोड यांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले. अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन दलाचे ३५ जवान कर्मचाऱ्यांनी या सरावात भाग घेतला.